Rain Update: राज्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. उकाडा मात्र जाणवत आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानासह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण, दमट हवामानासह तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची सरी हजेरी लावतील..Maharashtra Weather Update: उष्ण हवामान अन् पावसाची शक्यता.मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात हलक्या सरीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर बीड, परभणी, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..Maharashtra Rain Alert: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यातील काही भागात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज.तसेच विदर्भात अमरावती, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे..दक्षिण भारतातील कोमोरिन परिसरा चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा आणि तामिळनाडूमार्गे नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत हा हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानसह पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे..देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील जैसलमेर येथे उच्चांकी ४५.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात जळगाव येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरीने हजेरी लावली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.