Maharashtra Weather Forecast: मॉन्सून परतीच्या प्रवासावर असताना राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला आहे. आज (ता. ८) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मॉन्सून परतला असून, मॉन्सूनच्या परतीची वाटचाल बुधवारी (ता. ७) कायम होती. परतीसाठी पोषक हवामान असल्याने दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून काढता पाय घेणार आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक ते गोव्यापर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा सातत्याने ३५ अंशांच्या वर आहे. बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा येथे ३८ अंश सेल्सिअस, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि चंद्रपूर येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव राज्यातील नीचांकी १७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Rain Update: विदर्भात पावसाचा अंदाज; उन्हाचा चटकाही कायम.राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच, आज (ता. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बुधवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३५.७---२१.५अहिल्यानगर---३६.४---२४.७धुळे---३७.०---१७.६जळगाव---३७.५---१७.२जेऊर---३५.५---निरंककोल्हापूर---३३.६---२३.१.महाबळेश्वर---२७.५---१८.५मालेगाव---३६.८---२५.०नाशिक---३४.८---२०.६निफाड---३५.९---१९.४सांगली---३४.३---२१.९सातारा---३६.०---१९.५सोलापूर---३७.३---२२.२सांताक्रूझ---३३.५---२६.०.Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार.डहाणू---३३.२---२४.४रत्नागिरी---३३.८---२४.६छत्रपती संभाजीनगर---३७.४---२१.२धाराशिव---३३.८---२२.२परभणी---३५.४---१९.९परभणी (कृषी)---३५.२---१७.९अकोला---३७.९---२३.०.अमरावती---३९.६---२१.७ब्रह्मपूरी---३५.४---२३.८बुलडाणा---३६.०---२२.२चंद्रपूर---३७.०---२४.२गडचिरोली---३४.६--२२.२गोंदिया---३३.८---१९.८नागपूर---३३.८---१९.८वर्धा---३८.०---२२.५वाशीम---३६.०---१९.०यवतमाळ---३५.६---१९.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१७.०---३७.५पश्चिम महाराष्ट्र---१८.५---३७.३कोकण---२४.४--३३.८मराठवाडा---१७.९---३७.४विदर्भ---१९.०---३९.६.विजांसह पावसाची शक्यता : कोल्हापूर, सांगली.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : अमरावती ३९.६, वर्धा ३८, अकोला ३७.९, जळगाव ३७.५, छत्रपती संभाजीनगर ३७.४, सोलापूर ३७.३, धुळे ३७, चंद्रपूर ३७..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.