Maharashtra Weather Alert: कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमीच आहे. आज म्हणजेच शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. .तर जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर .Rain Update: तीन जिल्ह्यांतील १६७ मंडलांत हलका पाऊस .तर उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. उद्या म्हणजेच रविवारी पालघर, ठाणे, मुंबई, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत कांही ठिकाणी विजांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे..Rain Update In Maharashtra: कोकणात जोरदार पावसाचा इशारा; विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पाऊस हजेरी लावणार.तर सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..मॉन्सूनची प्रगती आज 'जैसे थे' आहे. सध्या मॉन्सूनची उत्तरेकडील सीमा जामनगर, उदयपूर, अजमेर, झुंझुनू, हिसार, भटिंडा या भागातून जात आहे. पुढील चार दिवसांत नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती असून, उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरातमधील आणखी काही भाग, हरियाणा व पंजाबचे उर्वरित भाग तसेच राजस्थानमधील आणखी काही भागांमध्ये मॉन्सून आगेकूच करण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.