Maharashtra Weather Forecast: राज्यात पावसाने उघडीप दिली असून तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावत आहे. राज्यात आजही प्रामुख्याने उघडीप राहून तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .आज धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..Maharashtra Rain Update : मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार?.राज्यात पावसाने उघडीप दिल्याने शेती पीकं तहानली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तूटही मोठ्या प्रमाणात वाढली आहे..Maharashtra Rain Update: मराठवाडा आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप?.मॉन्सूनचा आस असलेला ठळक कमी दाबाचा पट्टा ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या आग्नेय उत्तर प्रदेश तसेच वायव्य छत्तीसगड परिसरातून आता ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात सक्रिय आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारली असून उंचीनुसार दक्षिणेकडे झुकलेली आहे..मॉन्सूनचा आस अमृतसर, नजीबाबाद, फतेहगड, हरदोई, ईशान्य मध्य प्रदेशातील ठळक कमी दाबाचे केंद्र, दिघा ते पुढे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर वायव्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांपर्यंत समुद्रसपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवरील हवेचा जोडक्षेत्र आता कमी ठळक झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.