Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांत पावसाची उघडीप असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर पासून, मुझफ्फराबाद, पाटना तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरपर्यंत सक्रिय होता. मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ९.४ किलोमीटर उंचीदरम्यान पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोड क्षेत्र कायम आहे. पश्चिम मध्यप्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे..सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत घाटमाथ्यावरील आंबोणे येथे सर्वाधिक ५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली..Monsoon Rain: राज्यात पाऊस उघडीप देणार ? पुढील ५ दिवस पावसाचे प्रमाण कसे राहणार ?.आज (ता. १८) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या श्रावण सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..कमी दाबाचे क्षेत्र होतेय तीव्रवायव्य बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली कोलकत्याजवळ असलेली ही प्रणाली पश्चिम बंगालच्या बंकुरापासून १६० किलोमीटर आग्नेयेकडे, ओडिशाच्या बलेश्वरपासून १८० किलोमीटर ईशान्येकडे होती. आज (ता. १८) तीव्रता आणखी वाढून ही प्रणाली पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारकडे जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत..Maharashtra Monsoon: पावसाचा जोर ओसरला.सोमवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२८.९---२१.९अहिल्यानगर---३१.२---२४.७धुळे---३०---२०जळगाव---३१.४---२२.२जेऊर---३१.५---२२कोल्हापूर---२६.७---२२.२महाबळेश्वर---१९.९---१७.६.मालेगाव---२९.४---२१.४नाशिक---२८.९---२१.६निफाड---३०---२१.५सांगली---२९---२२सातारा---२९---२१.६सोलापूर---३४.४---२३.५सांताक्रूझ---३१.३---२६.४डहाणू---३२.१---२३.४.रत्नागिरी---३१---२४.४छत्रपती संभाजीनगर---३०.६---२२.४धाराशिव---३०.६---२१.४परभणी---३१.१---२३परभणी (कृषी)---३२.३---२१.५अकोला---३२.५---२५.१अमरावती---२९.८---२३.१ब्रह्मपूरी---२९.४---२३.बुलडाणा---२९.५---२२.४चंद्रपूर---३०.२---२२गडचिरोली---२९.४---२३.८गोंदिया---२६.४---२१.२नागपूर---३०.२---२२वर्धा---२९.८---२४वाशीम---२९.८---२०.४यवतमाळ---२८.२---२२.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०---३१.४पश्चिम महाराष्ट्र---१७.६---३४.४कोकण---२३.४--३२.१मराठवाडा---२१.४---३२.३विदर्भ---२०.४---३२.५विजांसह पावसाचा शक्यता :नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.