Maharashtra Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर काही भागात सरी हजेरी लावत आहेत. ढगाळ वातावरणासह ऊन-सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळत आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह विर्दभात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..आज पुणे घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.तर सातारा घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे..Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा इशारा.तसेच नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यांत जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामाशास्त्र विभागाने दिला आहे..तर उद्या म्हणजेच रविवारी पुणे घाटमाथ्यावर मुसळधारेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सातारा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. .Rain Update: कोकण घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात उघडीप.तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामाशास्त्र विभागाने दिला आहे. तर धुळे, नाशिक, जळगाव, जालना, जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे..सरासरी समुद्रसपाटीवरील मॉन्सूनचा आस सध्या जैसलमेर, नैऋत्य राजस्थान व लगतच्या भागातील कमी दाब क्षेत्राचे केंद्र, कोटा, गुना, सिधी, डाल्टनगंज आणि वायव्य बंगालच्या उपसागरावरील तसेच लगतच्या गंगेच्या पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या केंद्रातून जात असून, पुढे तो ईशान्य बंगालच्या उपसागराकडे विस्तारला आहे..दक्षिण-पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या गंगेच्या पश्चिम बंगाल-उत्तर ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाब क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची प्रणाली समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. पुढील दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.