Monsoon Arrival Update: राज्यात मॉन्सूनची वाटचाल ८ व्या दिवशीही रेंगाळलेलीच असून मॉन्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती नसल्याने मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. परिणामी राज्यातील अनेक भागांत उष्णता आणि उकाड्याचा त्रास वाढला असून विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे..आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे..Weekly Weather: राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता.मॉन्सूनने आज आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मात्र महाराष्ट्रातील पुढील वाटचाल अद्याप ठप्प आहे. सध्या मॉन्सूनची उत्तरेकडील सीमा हरणई, सोलापूर, हैदराबादमार्गे बिहारपर्यंत विस्तारलेली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मॉन्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे..आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक.मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानासह तुरळक सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. विदर्भात अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे, तर काही भागांत उष्णतेची लाटही जाणवू शकते. अकोला, बुलढाणा, वाशीम, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून उष्णतेचा चटका कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सूनची पुढील वाटचाल अद्याप संथ असली तरी पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भागात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.