Maharashtra Rain Update: नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मॉन्सूनची सलग दुसऱ्या दिवशीही वाटचाल पाहायला मिळाली आहे. मॉन्सूनने मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि ओडिशाचा उर्वरित भाग तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमधील आणखी काही भागांमध्ये मजल मारल्याचे हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता.२३) जाहीर केले आहे. .मॉन्सूनने आगेकूच करत असताना राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागात ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. आज कोकणातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज आणि रेड अलर्ट अर्थात इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून रायगड आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. .Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, संपूर्ण मराठवाडा व्यापला, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल.तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच धुळे, नंदुरबार, धुळे, सोलापूर जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे..तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तर भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..Monsoon Update: मॉन्सूनची वाटचाल ९ व्या दिवशीही ठप्प; राज्यात उष्णतेचा चटका, पावसाचाही अंदाज.आज मॉन्सूनची सीमा डहाणू, वर्धा, रायपूर, दाल्तनगंज आणि मोतिहारी या भागांतून जात आहे. मागील दोन आठवडे मॉन्सूनचा प्रवास रेंगाळला होता. परंतु सोमवारी (ता.२२) मॉन्सूनने पुण्यासह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत मजल मारली. त्यानंतर मॉन्सूनने वेगाने प्रवास करत अवघ्या २४ तासांत मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील वर्ध्यापर्यंत मजल मारली आहे. .राज्यात मॉन्सूनने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील बहुतांश भाग व्यापून विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळच्या दक्षिण भागापर्यंत प्रवेश केला आहे. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव हे जिल्हे व्यापले आहेत . मात्र उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि उतर विदर्भाचा काही भाग अजूनही मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहे. .पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सूनची आगेकूच कायम राहण्याची शक्यता असून या जिल्ह्यांच्या उर्वरित भागातही मॉन्सून मजल मारण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये मॉन्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यानंतरच्या ३ ते ४ दिवसांत झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतही मॉन्सूनची आगेकूच होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.