Maharashtra Weather Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने आज ईशान्य भारतातील उर्वरित सर्व राज्ये, संपूर्ण सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामुळे देशातील मॉन्सूनचा व्याप आणखी वाढला असून पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, असे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे..मॉन्सूनने सोमवारी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली. त्यानंतर आज या भागातील मॉन्सूनची वाटचाल आज 'जैसे थे' असून पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या आणखी भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. .Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच.पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांच्या आणखी काही भागात प्रगती करेल. तसेच तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग मॉन्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..सध्या मॉन्सूनची उत्तरेकडील सीमा अरबी समुद्रातील १८ अंश उत्तर अक्षांशापासून महाराष्ट्रातील हर्णे आणि सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, आंध्र प्रदेशातील नांद्याल, तामिळनाडूतील चेन्नई मार्गे पश्चिम बंगालमधील सिलीगुडी आणि सिक्कीम सीमेपर्यंत आहे..आज कोकणातील पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे..मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. .Maharashtra Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा.विदर्भात अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .उद्या म्हणजेच बुधवारी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..तर मराठवाड्यात बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज आहे. विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजा आणि वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता असून, काही भागांत मेघगर्जनाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.