Pune News: कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळांनी घामटा तापदायक ठरत आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आज (ता. १५) राज्यात उन्हाचा चटका वाढणार आहे. तर कोकणातील उष्ण व दमट हवामानाचा शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून, शनिवारी (ता. १४) राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता.१६) हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे..शनिवारी (ता. १४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात गारठा कमी होत असून, उन्हाचा चटका, उकाड्यातही वाढ झाली आहे..Maharashtra Weather Update: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला.आज (ता. १५) राज्याच्या तापमानात वाढ होणार असून, कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे..शनिवारी (ता. १४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.०---१४.०अहिल्यानगर---३२.८---१३.७धुळे---३४.०---११.०जळगाव---३३.२---१४.६जेऊर---३२.५---११.५कोल्हापूर---३१.६--१७.१.Weather Alert: रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उष्ण, दमट हवामानाचा इशारा.महाबळेश्वर---२६.७---१५.७मालेगाव---३३.४---१५.६नाशिक---३२.३---१४.७निफाड---३२.३---१२.०सांगली---३२.८---१६.६सातारा---३२.८---१४.५सोलापूर---३४.३---१८.२सांताक्रूझ---३२.६---१९.९डहाणू---३१.६---१९.०.रत्नागिरी---३५.५---१७.६छत्रपती संभाजीनगर---३२.२---१६.६धारशिव---३२.८---१६.४परभणी---३२.६---१५.७परभणी (कृषी)---३२.१---१२.०अकोला---३५.३---१८.०अमरावती---३५.६---१६.७बुलडाणा---३३.६---१८.६.ब्रह्मपुरी---३५.२---१७.१चंद्रपूर---३३.२---१८.०गडचिरोली---३१.४---१६.०गोंदिया---३२.२---१६.०नागपूर---३२.६---१७.५वर्धा---३३.२---१७.५वाशीम---३२.४---१५.६यवतमाळ---३३.३---१९.५.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---११.०---३४.०पश्चिम महाराष्ट्र---११.५---३४.३मराठवाडा---१२.०---३३.३विदर्भ---१५.६---३५.६कोकण---१९.०---३५.५उष्ण व दमट हवामानाची शक्यता :रत्नागिरी, सिंधुदुर्ग..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.