Weather Alert: ‘ऑक्टोबर हीट’ने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी गारठा, दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती असली, तरी कमाल तापमानातही हळूहळू घट होऊ लागली आहे. आज (ता. १४) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अद्यापही कमाल तापमान ३५ अंशांपार असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सातांक्रुझ आणि सोलापूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले..Maharashtra Weather: राज्यात थंडीची चाहूल; सकाळी गारठा वाढला.राज्यात गारठा वाढू लागला असून, अद्यापही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १२ अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२.३ अंश, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, जेऊर, नाशिक, नागपूर, यवतमाळ येथे पारा १४ अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. १४) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे..उपसागरात चक्रीवादळाचे संकेतदक्षिण अंदमान समुद्र परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. १३) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आज (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार आहे. तर मध्य बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत (ता. १६) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे..Weather Update: पहाटे गारठा, दुपारी चटका.शुक्रवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.६---१४.३अहिल्यानगर---३३.६---१६.३जळगाव---३३.४---१४जेऊर---३३.५---१३.५कोल्हापूर---३१.४---१७.८महाबळेश्वर---२६.१---१५.६नाशिक---३२.९---१३.९.निफाड---३३.१---१२.३सांगली---३२.९---१७सातारा---३३.६---१४.४सोलापूर---३५---१७.३सांताक्रूझ---३५.३---१८.९डहाणू---३४.९---१९.४रत्नागिरी---३६.२---१९.६छत्रपती संभाजीनगर---३३.९---१६.६.धाराशिव---३३.९---१८.१परभणी---३२.७---१६.८परभणी (कृषी)---३२.२---१२.४अकोला---३३.३---१७.६अमरावती---३३---१५.९ब्रह्मपूरी---३१---१६.६बुलडाणा---३१.८---१८.८चंद्रपूर---३२.४---१६.६.गडचिरोली---३१.८--१६.४गोंदिया---२९.८---१२नागपूर---३०.८---१३.४वर्धा---३२.५---१६.९वाशीम---३२.४---१५.४यवतमाळ---३३.४---१३.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२.३---३३.६पश्चिम महाराष्ट्र---१३.५---३५कोकण---१८.९--३६.२मराठवाडा---१२.४---३३.९विदर्भ---१२---३३.४राज्यात गारठा वाढलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : गोंदिया १२, निफाड १२.३, परभणी (कृषी) १२.४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.