
Weather Forecast :
डॉ. रामचंद्र साबळे
महाराष्ट्रावर आठवडाभर उत्तरेकडे १०१४, तर दक्षिणेकडे १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्याची शक्यता असल्यामुळे किमान तापमानात घट संभवते. वाढणारे थंडीचे प्रमाण रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मोहरी, जवस या पिकांच्या वाढीसाठी पोषक राहील. आंबा मोहर निघण्यास व ऊस पिकात साखरेचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त आहे.
कोकण व उत्तर महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली; पूर्व विदर्भातील गडचिरोली; पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांतही पावसात उघडीप व आकाश निरभ्र राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ,
पूर्व विदर्भात मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर या सर्व भागात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहून, थंडीचे प्रमाण चांगले राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात व धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहून, थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील.
रविवार (ता. २९ डिसेंबर) ते बुधवार (ता. १ जानेवारी) रोजी मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव राहील. सोमवार (ता. ३०) महाराष्ट्राच्या दक्षिण भागावर ढगाळ हवामान राहील, आणि कोकण किनारपट्टीवर १ जानेवारी रोजी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. त्याचा परिणाम कीड व रोग वाढण्यात होईल. हवामान बदलाच्या काही प्रभावामुळे थंडीवर परिणाम होऊ शकतो.
प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागात पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १८ अंश सेल्सिअस तर इक्वेडोरजवळ २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल; तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यातून बाष्प निर्मिती होऊन हवामान ढगाळ राहील.
१) कोकण : रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ०.१ मिमी अत्यल्प पावसाची शक्यता असून, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहून तापमानात घसरण होईल. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७ किमी, ठाणे जिल्ह्यात ताशी ६ किमी व पालघर जिल्ह्यात ताशी ९ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३४ अंश;
तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात २२ अंश; तर उर्वरित जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ टक्के राहील; तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ६० ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ३९ टक्के इतकी राहील.
२) उत्तर महाराष्ट्र : रविवारी नाशिक व धुळे जिल्ह्यांत ०१. ते ०.२ मिमी आणि जळगाव जिल्ह्यात ०.३ मिमी इतक्या अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहून, सध्याच्या थंडीत वाढ होईल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० किमी; तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ११ किमी राहील. कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यात २८ अंश; तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील.
आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १९ अंश; तर नंदूरबार जिल्ह्यात २० अंश आणि धुळे व जळगाव जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार जिल्ह्यात ५७ टक्के व धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यात ६० ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार जिल्ह्यात ३९ टक्के व नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ४४ ते ४७ टक्के राहील.
३) मराठवाडा : रविवारी बीड जिल्ह्यात ३.२ मिमी, परभणी जिल्ह्यात १.४ मिमी, हिंगोली जिल्ह्यात १.६ मिमी, जालना जिल्ह्यात ७.४ मिमी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पावसाची शक्यता दिसत नाही. वाऱ्याची दिशा धाराशिव व लातूर जिल्ह्यांत आग्नेयेकडून; तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड व बीड जिल्ह्यात ८ किमी; लातूर, परभणी, जालना व संभाजीनगर जिल्ह्यात ९ किमी; तर धाराशिव जिल्ह्यात व हिंगोली जिल्ह्यात ११ किमी राहील.
कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ अंश, बीड व जालना जिल्ह्यांत २८ अंश आणि नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २० अंश; धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत २१ अंश; तर परभणी जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७० ते ८० टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.
४) पश्चिम विदर्भ : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात ६.५ मिमी, अकोला जिल्ह्यात २.२ मिमी, वाशीम जिल्ह्यात ८.६ मिमी व अमरावती जिल्ह्यात ६.२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत १० किमी; तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ताशी ११ किमी राहील. कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश;
तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २१ अंश, आणि अकोला जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ७३ ते ७७ टक्के; तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५० टक्के राहील.
५) मध्य विदर्भ : रविवारी यवतमाळ जिल्ह्यात २.८ मिमी, वर्धा जिल्ह्यात ४.२ मिमी व नागपूर जिल्ह्यात ६.२ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहून, ताशी वेग ११ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ८० ते ८२ टक्के; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५० टक्के राहील.
६) पूर्व विदर्भ : रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात ०.४ मिमी, गडचिरोली जिल्ह्यात ०.३ मिमी, भंडारा जिल्ह्यात ४.४ मिमी व गोंदिया जिल्ह्यात ६.५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ६ किमी; चंद्रपूर जिल्ह्यात ताशी ८ किमी; भंडारा जिल्ह्यात ताशी १० किमी राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात २७ अंश;
भंडारा जिल्ह्यात २८ अंश; चंद्रपूर जिल्ह्यात ३० अंश; तर गडचिरोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १९ अंश; तर चंद्रपूर जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ८२ ते ८५ टक्के; तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ९० ते ९३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४३ ते ४७ टक्के; तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५१ टक्के राहील.
७) दक्षिण- पश्चिम महाराष्ट्र : रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात १.८ मिमी, सांगली जिल्ह्यात ०.४ मिमी, सातारा जिल्ह्यात ३.५ मिमी, पुणे जिल्ह्यात २.२ मिमी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ४.४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा अहिल्यानगर जिल्ह्यात ईशान्येकडून; तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली जिल्ह्यात १३ किमी;
तर पुणे व अहिल्यानगर ताशी ९ किमी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ताशी १० किमी आणि सोलापूर जिल्ह्यात ताशी ११ किमी राहील. कमाल तापमान अहिल्यानगर जिल्ह्यात २७ अंश; सातारा व पुणे जिल्ह्यांत २८ अंश; कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २९ अंश; सोलापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २० अंश, व उर्वरित जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.
कृषी सल्ला
१) पावसाचा संभाव्य अंदाज लक्षात घेऊन शेतीमाल ताडपत्रीने झाकावा.
२) पावसाचा अंदाज वर्तविलेल्या दिवशी तणनाशके व कीटकनाशकांची फवारणी करू नये.
३) सकाळीच अंजीर फळे व फुलपिकांची काढणी करावी. माल सुरक्षित ठिकाणी हलवावा.
४) कापसाची वेचणी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सकाळीच करावी.
५) कोकणात उन्हाळी भात पीक घ्यावयाचे असल्यास आता गादीवाफ्यावर बियाणे पेरून रोपे तयार करावीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.