Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

IMD Warning: राज्यात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आज (ता. २२) मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News: पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मॉन्सूनच्या आगमनाला आणखी अवकाश असला, तरी सर्वदूर पडणाऱ्या पावसाने मॉन्सूनच्या सरींचा अनुभव मिळत आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने दणका दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी शेताला शेततळ्याचे स्वरूप आले आहे. विदर्भात मात्र उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४३.१ अंश तापमानाची नोंद झाली. ‎‎नागपूर, ‎चंद्रपूर, ‎वर्धा, ‎यवतमाळ, ‎अकोला, ‎गडचिरोली, येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २२) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Rain Forecast
Monsoon 2025: माॅन्सून रविवारपर्यंत देशात एन्ट्री मारणार; माॅन्सूनने श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला

बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये. (सौजन्य : हवामान विभाग)

कोकण : दोडामार्ग, १४०, सावंतवाडी १३०, रामेश्‍वर (कृषी) १२०, मालवण ११०, संगमेश्‍वर देवरूख, मुळदे (कृषी) रत्नागिरी प्रत्येकी ९०, रोहा ८०, कुडाळ, मुरुड, खालापूर, माणगाव, श्रीवर्धन प्रत्येकी ७०, मुरबाड, सांताक्रूझ, खेड, कणकवली, माथेरान, प्रत्येकी ६०, लांजा, चिपळूण, देवगड, वसई, पोलादपूर, तळा, दापोली (कृषी) प्रत्येकी ५०, वैभववाडी, वाकवली, सुधागड-पाली प्रत्येकी ४०, पनवेल, अंबरनाथ, पेण, गुहागर, राजापूर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : चिंचवड १००, घोडेगाव ७०, लोणावळा (कृषी), वेल्हे, सातारा प्रत्येकी ६०, पौड, मावळ प्रत्येकी ५०, तळेगाव, दौंड, साक्री, पुणे शहर, जामखेड, नांदगाव, शिराळा, राजगुरूनगर, शिरूर, कोल्हापूर, चंदगड, राधानगरी, शिरपूर प्रत्येकी ४०, जत, सुरगाणा, नाशिक, कसबेडिग्रज, सिंदखेडा, जेऊर, कोकरूड, चास, अक्कलकुवा, मिरज, जावळी मेढा, कवठे महांकाळ, भोर प्रत्येकी ३०.

मराठवाडा : रेणापूर ९०, चाकूर, ७०, उदगीर ५०, वैजापूर, निलंगा, जळकोट प्रत्येकी ४०, पाटोदा, देवणी, देगलूर, प्रत्येकी ३०, सेलू, मुखेड, सिल्लोड, वाडवणी, लातूर, शिरूर अनंतपाळ, वाशी, मानवत, उदगीर, भूम, छत्रपती संभाजीनगर प्रत्येकी ३०.

‎बुधवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३४.८---२१.३

अहिल्यानगर---३४.८---२१.६

‎‎धुळे---३७.०---२०.०

जळगाव---३६.५---२३.८

‎जेऊर---३४.५---२०.०

‎कोल्हापूर---३२.६---२२.१

‎महाबळेश्‍वर---२७.८---१८.२

‎मालेगाव---३६.२---२२.६

‎नाशिक---३२.२---२१.०

‎निफाड---३५.०---२१.५

‎सांगली---३४.०---२२.२

‎सातारा---३३.७---२१.६

‎सोलापूर---३५.०---२३.४

‎सांताक्रूझ---३४.५---२६.१

डहाणू---३४.५---२६.१

Rain Forecast
Monsoon 2025: माॅन्सूनची श्रीलंकेत चाल; महाराष्ट्रात ५ दिवस वादळी पाऊस; माॅन्सूनचा इशारा

‎रत्नागिरी---३४.२---२४.२

‎छत्रपती संभाजीनगर---३५.८---२२.३

‎धाराशिव---३६.१---२१.०

‎परभणी---३९.०---२३.५

‎परभणी (कृषी)---३८.६---२३.७

‎अकोला---४०.७---२५.५

अमरावती---३९.६---२५.३

‎‎‎बुलडाणा---३२.८---२३.४

‎ब्रह्मपुरी---४३.१---२६.९

‎चंद्रपूर---४१.४---२५.८

‎गडचिरोली---४०.०---२५.२

‎गोंदिया---३८.८---२६.२

‎नागपूर---४२.२---२८.७

‎वर्धा---४१.१---२८.४

‎वाशीम---३९.८---निरंक

‎यवतमाळ---४१.०---२६.०

जोरदार वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाचा शक्यता (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर.

‎४१ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎ब्रह्मपुरी ४३.१, नागपूर ४२.२, ‎चंद्रपूर ४१.४, ‎वर्धा ४१.१, ‎यवतमाळ ४१.

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :

दोडामार्ग, १४०, सावंतवाडी १३०, रामेश्‍वर (कृषी) १२०, मालवण ११० (जि. सिंधुदुर्ग), चिंचवड १०० (जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com