Maharashtra Weather Update : आठवडाभर कमाल तापमानातील वाढ कायम

Summer Heat : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. कोकण, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रात सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ, तर मराठवाडा व विदर्भात दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Weather Update : राज्यात आज (ता. २८) १००८ हेप्टापास्कल, तर उद्यापासून (ता. २९) १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. आकाश ढगाळ राहील. त्यामुळे अवेळी पावसाची शक्यता कायम राहील. कोकण व उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याची दिशा मॉन्सूनच्या आगमनासाठी अनुकूल राहील.

कमाल तापमानात झालेली वाढ या आठवड्यात कायम राहील. मात्र कोकणात कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. पश्‍चिम महाराष्ट्रातही कमाल व किमान तापमानात घट होताना जाणवेल.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. कोकण, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रात सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत वाढ, तर मराठवाडा व विदर्भात दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. हवामान अत्यंत कोरडे राहील.

कोकणात अद्यापही वाऱ्याचा ताशी वेग कमी असल्याने मॉन्सूनची वाटचाल व प्रगती हळूवारपणे होताना जाणवेल. आज (ता. २८) राज्याच्या पूर्व भागात, तर उद्या (ता. २९) आणि परवा (ता. ३०) उत्तर तसेच दक्षिण व मध्य भागांत मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता राहील.

हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल व दक्षिणेस १०१२ हेप्टापास्कल, तसेच उत्तर भारतावरील १००२ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल आहेत.

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस, तर प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. त्याचा परिणाम मॉन्सूनच्या वाटचालीवर व प्रगतीवर होईल.

Weather Update
Weather Update : कमाल तापमानात चढ-उतार शक्य

कोकण

कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५३ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील. ही बाब मॉन्सूनच्या आगमनासाठी अनुकूल आहे.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, नाशिक, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ७० ते ७७ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात १८ टक्के इतकी कमी राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते २८ टक्के राहील.

वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वाऱ्याचा वेग नाशिक जिल्ह्यात ताशी १४ किमी व धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी २० ते २३ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. कमाल तापमान नांदेड व परभणी जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर धाराशीव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान नांदेड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धाराशीव, लातूर व बीड जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशीव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४० ते ५२ टक्के, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३४ ते ३८ टक्के राहील.

वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वारे ताशी १० ते २० किमी इतक्या वेगाने वाहतील. वाऱ्याचा वेग धाराशिव, लातूर व जालना जिल्ह्यांत ताशी २१ ते २२ किमी इतका राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. कमाल तापमान बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १६ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २५ किमी आणि वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्यता निर्माण होईल.

सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३३ ते ३५ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ४१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

Weather Update
Weather Update : उन्हाचा चटका ; ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ

पूर्व विदर्भ

कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पावसाची शक्यता राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १८ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान नगर व सोलापूर जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील.

सोलापूर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८८ टक्के, तर नगर, सोलापूर, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांत ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते २० किमी राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला

- काढणीस आलेल्या उन्हाळी पिकांची काढणी करावी.

- भात रोपवाटिका तयार कराव्यात.

- नवीन फळबाग लागवडीसाठी योग्य त्या आकारमानाचे खड्डे काढावेत.

- जमीन सपाट करून बांधबंदिस्तीची कामे करावीत.

- मातीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com