Monsoon Update 2023 : माॅन्सून कुठपर्यंत पोचला? माॅन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान: हवामान विभाग

Monsoon : देशात तब्बल आठ दिवस उशीरा प्रवेश करणाऱ्या माॅन्सूनच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Weather Update : देशात तब्बल आठ दिवस उशीरा प्रवेश करणाऱ्या माॅन्सूनच्या प्रवासाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. माॅन्सूनने काल केरळ आणि तमिळनाडूपर्यंत मजल मारली.

दोन राज्यांचा बहुतांशी भाग व्यापल्यानंतर माॅन्सून आपल्या भागात कधी दाखल होतो? याची वाट शेतकरी पाहत आहेत. आज माॅन्सूनची प्रगती झाली नसून पुढील २४ तासांमध्ये माॅन्सून काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

Monsoon Update
Monsoon Update : मॉन्सून केरळमध्ये दाखल

देशात दाखल होण्यासाठी माॅन्सूनने यंदा आठ दिवस उशीर केला. एरवी माॅन्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. पण बिपरजाॅय चक्रीवादळामुळे माॅन्सूनची वाटचाल थबकली होती. मात्र काल माॅन्सूनने देशाचे प्रवेशव्दार असलेल्या केरळमध्ये प्रवेश केला.

माॅन्सूनने काल दक्षिण अरबी समुद्र, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, करेळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूचा बहुतांशी भाग, कोमोरीनचा उर्वरित भाग, मध्य आणि ईशान्या बंगालचा उपसागर या भागात प्रगती केली होती.

आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. म्हणजेच माॅन्सून कालच्या जागेवर ठाण मांडून आहे. माॅन्सूनची सिमा आज कन्नूर, कोडाईकनाल, अदीरामपट्टीनम या भागात आहे. पुढील २४ तासांमध्ये मध्य अरबी समुद्रात आणखी प्रगती करण्यास अनुकूल स्थिती आहे, असे हवामान विभागाने सांगितले.

तसेच उर्वरित केरळ, तमिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकाचा काही भाग आणि बंगालच्या ईशान्य भागात माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये प्रगती करण्यास पोषक वातावरण आहे, असेही हवामान विभागाने जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com