Rain Update In Parli : परळी तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

परळी वैजनाथ शहर व तालुक्यातील काही गावात मंगळवारी (ता. ११) संध्याकाळी ७ च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Beed Rain News : परळी वैजनाथ शहर व तालुक्यातील काही गावात मंगळवारी (ता. ११) संध्याकाळी ७ च्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. गेले दोन दिवस उन्हाचा तडाखा बसला, सायंकाळच्या सुमारास पाऊस पडला.

शहर व परिसरात मंगळवारी (ता. ११) दिवसभर उकाडा जाणवला व सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. गेल्याच आठवड्यात तालुक्यातील काही गावात गारांचा वादळी पावसाने थैमान घातले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्यानंतर अधूनमधून आभाळ येवू लागले. पण ऊनही पडत होते. मात्र उखाडा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.

Rain Forecast
IMD Rain Prediction : मोसमी पाऊस यंदा सरासरीइतका

जवळपास पाऊणतास या अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाऊस झाल्याने कुठे नुकसान झाले यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही. ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने सध्या ज्वारी, गहू काढणी सुरू आहे. यावर या वादळी पावसाचा परिणाम झाला आहे.

तर पालेभाज्या, टरबूज, खरबूज व फळबागांचे नुकसान होत आहे. तसेच आंब्याचे वादळी वाऱ्यामुळे व गेल्या आठवड्यात पडलेल्या गारांमुळे मोठे नुकसान झाले आहे.

अगोदरच्याच म्हणजे पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टची नुकसानीची भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. आता पुन्हा निसर्गाने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे केले आहे.

शासन मात्र कुंबकर्णाची भुमिका घेताना दिसून येत आहे. तर पालकमंत्री काही जिल्ह्यात फिरकायला तयार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com