Maharashtra Monsoon Update: मॉन्सून दाखल झाल्यानंतर पाऊस सुरू होण्यास पोषक हवामान आहे. आज (ता. २४) कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे देशातील उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून बिहारपर्यंत सक्रिय आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पश्चिम-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे..मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती येथे ४१ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात घट होत असून, विदर्भ वगळता राज्याच्या कमाल तापमानाचा पारा चाळिशाखाली आले आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Monsoon Rain: मॉन्सूनची घोडदौड सुरुच; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा.राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात झाली असून, आज (ता. २४) रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मंगळवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.०---२४.५अहिल्यानगर---३७.८---२४.५धुळे---३७.०---२१.५जळगाव---३९.४---२५.७जेऊर---३७.०---२०.०कोल्हापूर---३०.८--२३.०महाबळेश्वर---२२.६---१८.०.मालेगाव---३५.२---२१.६नाशिक---३३.५---२३.६निफाड---३५.१---२३.१सांगली---३१.९---२३.३सातारा---३२.८---२३.३सोलापूर---३८.०---२५.४सांताक्रूझ---३४.६---२५.१डहाणू---३३.६---२३.८.Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान.रत्नागिरी---३२.९---२४.३छत्रपती संभाजीनगर---३८.५---२५.०परभणी---३९.५---२५.५परभणी (कृषी)---३९.५---२५.५अकोला---४१.०---२६.०अमरावती---४१.२---२२.८भंडारा---४०.०---२४.०बुलडाणा---३५.८---२२.०.ब्रह्मपूरी---३९.८---२२.९चंद्रपूर---३९.५---२४.२गडचिरोली---४०.२---२४.६गोंदिया---४०.५---२३.६नागपूर---४०.६---२२.८वर्धा---४३.०---२४.१वाशीम---३७.४---२०.२यवतमाळ---४०.२---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२१.५---३९.४पश्चिम महाराष्ट्र---१८.०---३८.०मराठवाडा---२५.०---३९.४विदर्भ---२०.८---४३.०कोकण---२३.८---३४.६.जोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) : रत्नागिरी.जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, पुणे.विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.उष्ण हवामानाची शक्यता (येलो अलर्ट) : अकोला, अमरावती.उन्हाचा चटका कायम असलेली ठिकाणे : वर्धा ४३, अमरावती ४१.२, अकोला ४१,.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.