Pune News: उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भासह कोकणात उष्णतेची लाट आली आहे. नंदूरबार येथे हंगामात प्रथमच पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. आज (ता. १३) कोकणात उष्ण लाटेचा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..गुरुवारी (ता. १२) छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार येथे देशातील उच्चांकी ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Weather Update: राज्यातील २१ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता.कमाल तापमान ४० अंशांपार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नंदुरबारसह विदर्भातील अकोला, अमरावती येथे उष्णतेची लाट होती. तर जळगाव आणि ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक धुळे, मालेगाव, निफाड, बुलडाणा, वर्धा आणि वाशीम येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..आज (ता. १३) उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे उष्ण लाटेची शक्यता, विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Maharashtra Weather Update: विदर्भासह कोकणात उष्णतेची लाट.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणेनंदूरबार, अकोला ४१,अमरावती ४०.४,जळगाव ४०.४,ब्रह्मपुरी ४०..उष्ण लाटेचा इशारा(येलो अलर्ट) :पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :यवतमाळ, चंद्रपूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.