

Heat wave : पुणे : पूर्वमोसमी पावसाने उघडीप देताच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट (Heat Wave) आली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा देखील तापदायक ठरत आहेत. आज (ता. १५) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा आहे.
तर पूर्व विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमाल तापमान चाळिशीपार गेल्याने व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम येथे उष्णतेची लाट आली आहे.
बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला राज्यातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती, गोंदिया येथे पारा ४३ अंशांच्या पार होता. तसेच विदर्भात बुलडाणा वगळता सर्वच ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात तापमान ३६ ते ४२ अंशाच्या दरम्यान आहे.
तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे.
उन्हाच्या चटक्या बरोबरच उकाडा असह्य होत आहे. आज (ता. १५) पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, वादळी पावसाचा, तर विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे.
तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३३.६ (२५.४), जळगाव ४१.५ (२७.४), धुळे ४१.० (२५.५), कोल्हापूर ३३.६ (२४.३), महाबळेश्वर २१.७ (१८.५), नाशिक ३४.८ (२५.३), निफाड ३६.६ (२६.५), सांगली ३४.८ (२४.०), सातारा ३३.४ (२४.७), सोलापूर ३९.२ (२४.५), सांताक्रूझ ३५.६ (२६.८), डहाणू ३५.५ (२७.३), रत्नागिरी ३३.० (२५.४), छत्रपती संभाजीनगर ३७.५ (२३.६), नांदेड ४०.८ (२७.२), परभणी ४०.३ (२६.१), अकोला ४३.५ (२९.०), अमरावती ४३.२(२७.३), बुलडाणा ४०.५ (२५.५), ब्रह्मपुरी ४२.२ (३१.०), चंद्रपूर ४२.६(३०.५), गडचिरोली ४२.० (२७.८), गोंदिया ४३.० (२७.२), नागपूर ४२.० (२७.४), वर्धा ४२.५(३०.६), वाशीम ४२.२(२६.२) यवतमाळ ४२.२ (२७.२).
उष्ण लाटेचा इशारा :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा,
वादळी पावसाचा इशारा :
धुळे, नंदूरबार, जळगाव, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
अकोला ४३.५, अमरावती ४३.२, गोंदिया ४३.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.