Heat Wave : उन्हाचा चटका वाढणार; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Latest Weather News : आज (ता. १४) विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Heat Wave
Heat Wave Agrowon
Published on: 
Updated on: 

Weather Update Pune : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. आज (ता. १४) विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात वादळी पावसाचा, तर उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, ब्रह्मपुरी, गडचिरोली, नागपूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात तापमान ३६ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे.

Heat Wave
Monsoon Update : मॉन्सून, माती अन् मशागत यांचा संबंध जाणून घ्या

तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. मात्र उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसानेही उघडीप दिली आहे. आज (ता. १३) विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनची चाल मंदावली

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १२) संपूर्ण तमिळनाडूसह कर्नाटकचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भागांसह कोकणच्या आणखी काही भागांत प्रगती केली. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे पश्‍चिम किनाऱ्यावर वेगाने प्रगती करणाऱ्या मॉन्सूनची पुढील चाल मात्र मंदावली आहे. मंगळवारी (ता. १३) मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही.

Heat Wave
Weather Forecast : राज्यात आज वादळी पाऊस पडण्याचा अंदाज

मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.४ (२५.८), जळगाव ४२.४ (२८.४), धुळे ३९.५ (-), कोल्हापूर ३३.१ (२४.१), महाबळेश्‍वर २४.७ (१८.३), नाशिक ३७.२ (२५.८),

निफाड ३८.१ (२५.४), सांगली ३४.१ (२४.१), सातारा ३४ (२४.७), सोलापूर ३९.२ (२४.६), सांताक्रूझ ३६.८ (२७.९), डहाणू ३५.३ (२७.२), रत्नागिरी ३४.३ (२५.५),

छत्रपती संभाजीनगर ३७.५ (२४), नांदेड - (२७.४), परभणी ४०.७ (२६.७), अकोला ४२.८ (३०), अमरावती ४०.२ (२६.९), बुलडाणा ३८ (२६.६), ब्रह्मपुरी ४२.७ (२७.६),

चंद्रपूर ४३.२ (३०), गडचिरोली ४२ (२७.६), गोंदिया ४३.२ (२७.४), नागपूर ४२ (२६.६), वर्धा ४१.८ (२४.४), वाशीम ४१.६ (२६.६) यवतमाळ ४१ (२७.५).

वादळी पावसाचा अंदाज

विदर्भ : अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com