

Weather Update Pune : राज्यात वादळी पाऊस, गारपिटीचे (Hailstorm Forecast) सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात गारपिटीने तडाखा दिला आहे.
आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर उद्यापासून (ता. १३) मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा (Hailstorm Alert) देण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.
एकीकडे वादळी पाऊस सुरू असतानाच, उन्हाचा चटका देखील वाढत आहे. तर उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर धुळे येथे तापमान ३९ अंशावर होते. परभणी, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे पारा ३८ अंशांच्या पार गेला आहे. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते.
आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
आज (ता. १२) मध्य महाराष्ट्र, वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. कोकणात विजांसह पावसाची शक्यता असून, कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३७.१ (१९.९), जळगाव - (२७.१), धुळे ३९.० (१९.०), कोल्हापूर ३७.५ (२३.७), महाबळेश्वर ३०.९ (१८.६), नाशिक ३५.४ (२०.०),
निफाड ३७.४(१६.५), सांगली ३७.४ (२३.२), सातारा ३७.० (२२.०), सोलापूर ३९.४ (२४.१), सांताक्रूझ ३६.६ (२६.६), डहाणू ३४.० (२४.४), रत्नागिरी ३४.९ (२४.९),
छत्रपती संभाजीनगर ३६.१ (२०.८), नांदेड - (२४.४), परभणी ३८.८ (२३.६), अकोला ३६.७ (२२.५), अमरावती ३७.४(२२.३), बुलढाणा ३६.४ (२२.८), ब्रह्मपूरी ३८.६ (२३.०),
चंद्रपूर - (२४.६), गडचिरोली ३५.८(२१.०), गोंदिया ३७.० (२१.८), नागपूर ३८.२ (२२.०), वर्धा ३८.५(२३.५), वाशीम ३७.२ (२२.२), यवतमाळ ३७.५ (२१.५).
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.