El Nino Impact: जागतिक तापमानात २०२६ या वर्षात असामान्य वाढ झाली आहे. परिणामी, बर्फ वितळण्याबरोबरच समुद्राच्या पातळीतही विक्रमी वाढ होत आहे. अत्यंत तीव्र स्वरूपाची ‘एल निनो’ स्थिती निर्माण होत असल्याने या वर्षी जागतिक हवामानाचे विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. यातच २०२७ पर्यंत उष्णता आणि टोकाच्या हवामान घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे..तुर्कीयेतील अंताल्या येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, मागील सलग १२ वर्षे आतापर्यंतच्या नोंदीनुसार सर्वाधिक उष्ण वर्षे ठरली आहेत. त्यापैकी मागील चार वर्षांचा समावेश सर्वाधिक उष्ण वर्षांच्या यादीतील पहिल्या चार क्रमांकांवर आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जागतिक सरासरी पृष्ठभागाचे तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळातील (१८५०–१९००) सरासरी तापमानापेक्षा सुमारे १.४७ अंश सेल्सिअस अधिक नोंदविले गेले. यातच सध्या असलेल्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे वर्षअखेरीस हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टपासून एल निनोचा प्रभाव तीव्र होत असून, डिसेंबरपर्यंत तो आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्र एल निनो ठरू शकतो..Sindhudurg Weather: सिंधुदुर्गात थंडीची चाहूल; बागायतदारांना दिलासा.पृथ्वीचे ऊर्जा असंतुलन वाढत असून, हवामान प्रणालीमध्ये उष्णता साठण्याचा वेगही वाढत आहे. वातावरणातील हरितगृह वायूंमुळे विक्रमी प्रमाणात उष्णता अडकून पडत आहे. सूर्यापासून पृथ्वीवर येणारी ऊर्जा आणि पृथ्वीपासून बाहेर जाणारी ऊर्जा यांच्यातील.संतुलन बिघडत आहे. या अतिरिक्त उष्णतेपैकी सुमारे ९० टक्के उष्णता महासागर शोषून घेत आहेत. महासागरांच्या तापमानाच्या दृष्टीने २०२६ हे सलग दहावे विक्रमी उष्ण वर्ष ठरण्याच्या मार्गावर आहे..समुद्राची जागतिक सरासरी पातळी आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. २०२६ मध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानही अनेक महिन्यांत विक्रमी पातळीवर राहिले. हिमनद्या सातत्याने मागे सरकत आहेत. २०२५ मध्ये वितळलेल्या बर्फाचे प्रमाण इतके प्रचंड होते, की त्यातून दर सेकंदाला पाच ऑलिम्पिक आकारांच्या जलतरण तलावांमध्ये मावेल एवढे पाणी तयार झाले असते. २०१४ पासून पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा साठाही कमी होत आहे..समुद्राची जागतिक सरासरी पातळी आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. २०२६ मध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानही अनेक महिने विक्रमी पातळीवर राहिले. हिमनद्या सातत्याने मागे सरकत आहेत. २०२५ मध्ये वितळलेल्या बर्फाचे प्रमाण इतके प्रचंड होते, की त्यातून दर सेकंदाला पाच ऑलिम्पिक आकारांच्या जलतरण तलावांमध्ये मावेल एवढे पाणी तयार झाले असते. २०१४ पासून पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा साठाही कमी होत आहे..संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, ‘‘आपण हवामानातील टोकाच्या घटनांच्या एका नव्या युगात प्रवेश केला आहे. मानवनिर्मित हवामान बदलामुळे आधीच अतितप्त झालेल्या पृथ्वीवर आता अत्यंत तीव्र ‘एल निनो’चा प्रभाव पडत आहे. .October Heat: राज्यात तापमानाची उसळी; ऑक्टोबर ‘हीट’चा तडाखा.हवामानाचे विक्रम सातत्याने मोडले जात आहेत. हरितगृह वायूंचे उत्सर्जन वेगाने कमी करणे, जीवाश्म इंधनापासून स्वच्छ ऊर्जेकडे न्याय्य पद्धतीने संक्रमण करणे आणि असुरक्षित देशांना आवश्यक आर्थिक मदत व संरक्षण देणे यासाठी गंभीर पावले उचलणे आवश्यक आहे.’’.जागतिक हवामान संघटनेच्या सरचिटणीस सेलेस्टे साऊलो म्हणाल्या, ‘‘२०२६ मधील एल निनो आणि जागतिक हवामानाची स्थिती पाहता ‘विक्रमी आकडे’ ही संकल्पनाच आता अपुरी ठरत आहे. एल निनो पृथ्वीवर केवळ नवीन उष्णता निर्माण करत नाही, तर महासागरात साठलेली उष्णताही बाहेर आणत आहे. महासागरांचे तापमान यापूर्वी कधीही नव्हते इतके वाढलेले असल्यामुळे अधिक उष्णता बाहेर पडत आहे.”.त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आपण हवामान प्रणालीला अधिकाधिक तीव्र बनवत आहोत. ‘एल निनो’ या धोक्याची तीव्रता अनेक पटींनी वाढवणार आहे. उष्णतेच्या लाटा, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि अतिवृष्टीच्या घटना ऐतिहासिक नोंदींवर आधारित अंदाजापेक्षा अधिक वेगाने तीव्र होत आहेत. यंदा जगभरातील लोकांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागला. नेपाळमध्ये हिमनदी आणि खडक कोसळल्यामुळे झालेली भीषण दुर्घटना, तसेच अचानक आलेल्या पुरामुळे उष्ण होत असलेल्या उंच पर्वतीय प्रदेशांतील धोक्यांचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे.’’.जागतिक सरासरी तापमानातील फरक१८५० ते १९०० च्या सरासरीच्या तुलनेत फरकबर्कले अर्थ (१८५०-२०२४.१२)ईआरए५ (१९४०-डिसेंबर २०२४.१२)जीआयएसटीईएमपी (१८८०-२०२४.१२)हॅडक्रुट५ (१८५०-२०२४.१२)जेआरए-३क्यू (१९४७-२०२४.१२)एनओएए ग्लोबल टेम्प व्ही६ (१८५०-२०२४.१२)जीआयएसटेम्प (१८८०–२०२६.०९)हॅडक्रुट ५ (१८५०–२०२६.०९)जेआरए-३क्यू (१९४७–२०२६.०९)एनओएए ग्लोबल टेम्प व्ही६ (१८५०–२०२६.०९).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.