Rain Prediction : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात वाढत होत आहे.
Rain Prediction
Rain PredictionAgrowon
Published on: 
Updated on: 

Rain Prediction पुणे : राज्यात उन्हाचा चटका (Summer Heat) वाढू लागल्याने कमाल तापमानात (Temperature) वाढ झाली आहे. यातच राज्यात वादळी पावसाला (Stormy Rain) पोषक हवामान असल्याने आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा (Rain Forecast) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात वाढत होत आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोलापूर, अकोला, ब्रह्मपूरी, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १२ अंशांच्या पुढे कायम आहे.

Rain Prediction
Unseasonal Rain : वादळी पावसाचा वीस हजार शेतकऱ्यांना फटका

तामिळनाडूपासून, रायलसीमा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत.

यातच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर तसेच रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Prediction
Nashik Stormy Rain : वादळी पावसाने साडेसात हजार हेक्टरवर धुळधाण

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.२ (१४.७), नगर ३२.६ (१७.१), जळगाव ३४.२ (१४.३), धुळे ३४.० (१३.५), कोल्हापूर ३४.१ (१९.७), महाबळेश्वर २७.६ (१४.१),

नाशिक ३१.३ (१६.२), निफाड ३२.४(१२.०), सांगली ३४.१ (१९.३), सातारा ३३.२ (१६.५), सोलापूर ३५.५(२०.६), सांताक्रूझ ३१.७ (२२.४), डहाणू ३०.६ (२१.३), रत्नागिरी ३३.१ (२२.३),

छत्रपती संभाजीनगर ३२.५ (१९.०), नांदेड ३४.८ (२०.८), परभणी ३४.९ (२०.९), अकोला ३५.४ (२०.९), अमरावती ३४.८(१९.३), बुलढाणा ३१.६ (२०.४), ब्रह्मपूरी ३५.२ (२०.२),

चंद्रपूर ३७.२ (२२.०), गडचिरोली ३२.४(१९.४), गोंदिया ३४.० (२१.०), नागपूर ३३.८ (१९.७), वर्धा ३५.९(२१.२), वाशीम ३४.२ (१९.८), यवतमाळ ३५.५ (१९.२).

शनिवारी (ता.२५) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक.

मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com