Mocha Cyclone : ‘मोचा’ चक्रीवादळाची तीव्रता वाढतेय

Cyclone Mocha Update : या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव जाणवणार नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून, बुधवारी (ता. १०) सकाळी वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तयार झाली.
Mocha Cyclone
Mocha CycloneAgrowon
Published on
Updated on

India Weather Update : बंगालच्या उपसागरात गुरुवारी (ता. ११) ‘मोचा’ चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत असलेल्या या वादळी प्रणालीची तीव्रता वाढत असून, रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव जाणवणार नाही.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून, बुधवारी (ता. १०) सकाळी वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तयार झाली. ही प्रणाली आणखी तीव्र होत गुरुवारी (ता. ११) सकाळी उपसागरात चक्रीवादळ तयार झाले.

Mocha Cyclone
Mocha Cyclone : बंगालच्या उपसागरात घोंघावतंय ‘मोचा’ चक्रीवादळ

दुपारी ही प्रणाली पोर्ट ब्लेअरपासून ५१० किलोमीटर नैॡत्येकडे, बांगलादेशाच्या कॉक्सबाजार पासून ११९० किलोमीटर दक्षिणेकडे, म्यानमारच्या सिट्वेपासून ११०० किलोमीटर नैॡत्येकडे होती.

Mocha Cyclone
Summer Heat : उन्हाच्या झळा ठरताहेत तापदायक

या वादळाची तीव्रता वाढून उपसागरात गुरुवारी (ता. ११) रात्री तीव्र वादळाची तर शुक्रवारी (ता. १२) सायंकाळपर्यंत चक्रीवादळ अतितीव्र होणार आहे. या वेळी ताशी १४० ते १६५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. अतितीव्र चक्रीवादळ रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत बांगलादेशाच्या कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या ‘क्याउक्प्यू’ दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

‘मोचा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अंदमान आणि निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार बोटसमुह, ईशान्य भारतातील त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर, पूर्व अरुणाचल प्रदेश व दक्षिण आसाम राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com