Cyclone Biporjoy : 'बिपॉरजॉय' चक्रीवादळाचा मार्ग बदलला

Cyclone Biporjoy Latest Update : अरबी समुद्रातील 'बिपॉरजॉय' चक्रीवादळीची तीव्रता आणखी वाढली असून, वादळाचा मार्ग बदलला आहे.
Biporjoy Cyclone
Biporjoy CycloneAgrowon

Weather Update : अरबी समुद्रातील 'बिपॉरजॉय' चक्रीवादळीची तीव्रता आणखी वाढली असून, वादळाचा मार्ग बदलला आहे. हे अतितीव्र चक्रीवादळ गुरूवारपर्यंत (ता. १५) ताशी १२५ ते १५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह गुजरात आणि पाकीस्तानच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. ११) ही प्रणाली मुंबईपासून ५६० किलोमीटर पश्चिमेकडे, गुजरातच्या पोरबंदरपासून ४६० किलोमीटर, देवभूमी द्वारकेपासून ५१० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, तर पाकिस्तानच्या कराचीपासून ७७० किलोमीटर दक्षिणेकडे होती.

Biporjoy Cyclone
Cyclone Biporjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत; मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता

हे वादळ बुधवारपर्यंत उत्तरेकडे जाणार असून, त्यानंतर ईशान्य दिशेकडे वळून गुजरातच्या मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

वादळामुळे अरबी समुद्र खवळला असून, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली असून, किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत.

Biporjoy Cyclone
Cyclone Biporjoy : बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात दक्षतेचा इशारा

या चक्रीवादळामुळे पश्चिम-मध्य अरबी समुद्रात ताशी १६० ते १९५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. बुधवारपासून (ता. १४) कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागड आणि सौराष्ट्राच्या मोरबी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

किनाऱ्यावर २ ते ३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून, सखल भागात पाणी भरण्याबरोबरच पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे कच्ची पक्की घरे, विजांचे खांब, नारळ, आंब्यासारखी झाडे पडण्याची शक्यता आहे. रेल्वे, दूरसंचार, दळणवळणाच्या सुविधा देखील वादळामुळे प्रभावीत होऊन जनजीवन विस्कळीत होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com