Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाची तिव्रता वाढत जाणार; माॅन्सूनवर काय परिणाम होणार?

IMD Weather Update : पुढील २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकताना चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचेही 'आयएमडी'ने म्हटले आहे.
Biparjoy Cyclone
Biparjoy CycloneAgrowon
Published on
Updated on

Cyclone Biparjoy News Updates : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात  'बिपरजॉय' चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले आहे. हवामान विभागाने माहिती दिली त्यावेळी ही चक्रीवादळ २ किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत होते.

पुढील २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकताना चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचेही 'आयएमडी'ने म्हटले आहे.

हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून ८९० किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून १००० किलोमीटर अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण भागापासून १०७० किलोमीटर आणि पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून १३७० किलोमीटर अंतरावर आहे.

'बिपरजॉय' चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर आहे. तसेच चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे भारताला या वादळाचा थेट धोका पोचण्याची शक्यता कमी आहे. मात्र, वेगवान वाऱ्यांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो.

पुढील पाच दिवस केरळ, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रात मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये, अशी सूचना 'आयएमडी'ने दिली आहे.

माॅन्सून कधी येऊ शकतो?

बिपरजॉय चक्रीवादळाचा माॅन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. केरळमधील आगमनावरही परिणाम होऊ शकतो, हवामान विभागाने स्पष्ट केले. आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या दरम्यान पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहाने साडेचार किलोमीटरची अपेक्षित उंची गाठली आहे.

माॅन्सूनच्या आगमनासाठी आता फक्त सर्वदूर आणि सलग पावसाची प्रतीक्षा आहे. वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर, केरळमध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते. तेव्हा मान्सूनचे आगमन जाहीर करण्यात येईल. त्यामुळे केरळमध्ये माॅन्सून कधीही दाखल होऊ शकतो. तर महाराष्ट्रात १६ जूनच्या दरम्यान माॅन्सून दाखल होऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com