महाराष्ट्रावर आज (ता. १९) १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र उद्या (ता. २०) १०१२ हेप्टापास्कल आणि किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. जेव्हा तापमानात वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होतात. हवेचे दाब कमी झाल्यावर वारा मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतो.
त्यामुळे ढगाळ हवामानाची स्थिती तयार होते. त्याचा परिणाम तापमानावर होतो. परिणामी, किमान तापमानात वाढ होऊन रात्रीची व पहाटेची थंडी कमी होते. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी भागांत आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच भागात वाऱ्याची दिशा पूर्वेकडून व आग्नेयेकडून राहील. त्याचाही थंडीवर परिणाम होईल. ढगांचे प्रमाण वाढून काही ठिकाणी पावसाची शक्यताही निर्माण होईल.
प्रशांत महासागर, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान समान म्हणजे ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार नाही. वाऱ्याची दिशा आग्नेय व पूर्वेकडून राहण्यामुळे बंगालच्या उपसागरावरील बाष्प मोठ्या प्रमाणात पूर्व, मध्य व पश्चिम विदर्भासह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रावर जमा होईल. या सर्व कारणांमुळे या आठवड्यात हवामान बदल जाणवतील. याचा परिणाम किमान तापमानात वाढ होऊन थंडीचे प्रमाण कमी होईल. अशा स्थितीमध्ये पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
कोकण
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमानात घसरण होऊन ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस, तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६५ ते ७२ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४५ ते ५१ टक्के इतकी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५१ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान नांदेड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस आणि लातूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४८ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत पूर्वेकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ५४ ते ६४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३५ टक्के राहील. आकाश ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने पूर्वेकडून राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात पूर्वेकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७२ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ३७ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा गडचिरोली जिल्ह्यात पूर्वेकडून तर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ, तर सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ८० टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ६० ते ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ५० टक्के सर्वच जिल्ह्यांत राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा पूर्वेकडून सर्वच जिल्ह्यात राहील.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.