Winter Update : राज्यात गारठा वाढला

Cold Weather Update : राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी, राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने दिसून येत आहे.
Winter Season
Winter SeasonAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी, राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने दिसून येत आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. निफाड, धुळे, जळगाव येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीमध्ये चढ-उतार होत आहेत. मंगळवारी (ता. २३) उत्तर प्रदेशातील मेरठ यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंशांदरम्यान तर, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात ६ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही हवामान स्थिती टिकून आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. विदर्भात ढगाळ हवामान कायम असून, राज्यातही तुरळक अंशतः ढगाळ आकाश पहायला मिळत आहे.

Winter Season
Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी कायम असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ७ अंश, तर जळगाव येथे ९.६ अंश तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा १० ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. अनेक ठिकाणी पारा घसरल्याने गारठा वाढल्याचे दिसून आले. राज्याच्या किमान तापमानात घट, गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

Winter Season
Cold Weather Update : उत्तर महाराष्ट्राला पुन्हा हुडहुडी

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.४ (११.४), नगर २९.२ (११.७), धुळे २७.० (७.०), जळगाव २८.० (९.६), कोल्हापूर ३२.१ (१५.१), महाबळेश्वर २६.१ (११.५), नाशिक २९.५ (१०.५), निफाड २८.४ (६.४), सांगली ३२.३ (१३.९), सातारा ३१.६ (१२.०), सोलापूर ३४.०(१८.०), सांताक्रूझ ३१.१ (१४.८), डहाणू २७.७ (१५.३), रत्नागिरी ३१.० (१७.१),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१२.३), नांदेड ३१.२ (१८.६), परभणी ३०.० (१७.२), अकोला ३०.० (१७.४), अमरावती २९.० (१८.७), बुलढाणा २६.७ (१५.२), ब्रह्मपूरी ३०.६ (१७.७), चंद्रपूर २९.६ (१७.६), गडचिरोली २८.६ (१७.६), गोंदिया २७.० (१४.१), नागपूर २७.४(१९.४), वर्धा २८.८(१९.०), वाशीम ३०.८ (१५.८), यवतमाळ ३०.५ (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com