Weather Update In Maharashtra : महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब मंगळवार (ता.१८)पर्यंत राहील. बुधवार (ता. १९) नंतर कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यावरील हवेचे दाब १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील.
वायव्य व उत्तर भारतावरील हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके कमी होतील. तापमानात वाढ होते, त्या वेळी हवेचे दाब कमी होतात. कमाल व किमान तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संपूर्ण भारतावरील हवेचे दाब कमी झाल्याचे दिसून येईल.
दिवसाचा कालावधी वाढत जाऊन उष्णतेत वाढ होईल. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होईल. पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव कमी झालेला असेल.
अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस, बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०.४ अंश सेल्सिअस तर प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे एल निनोचा प्रभाव सध्या तरी नाही.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात त्यात ५ टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते.
तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी- इंडियन ओशन डायपोल) हा मॉन्सून कालावधीत ‘धन’ (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे. यंदा देशात प्रखर दुष्काळी स्थितीची शक्यता कमी आहे.
आज आणि उद्या (ता. १६, १७) कोकण, नाशिक व नंदूरबार, धाराशीव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७४ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५३ ते ५९ टक्के, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३४ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी आणि वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. आज (ता.१६) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत १० ते १२ मिमी, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.१७) ३ मिमी पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
आज (ता.१६) नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किमी राहील. कमाल तापमान नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत ११ ते १५ किमी तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ९ किमी राहील.
मराठवाडा
आज (ता. १६) धाराशीव, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ५ ते ७ मिमी तर उद्या (ता.१७) लातूर जिल्ह्यात ४ मिमी आणि नांदेड जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण अल्प राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
वाऱ्याचा ताशी वेग बीड व जालना जिल्ह्यांत १४ ते १८ किमी इतका अधिक राहील. तर परभणी व हिंगोली जिल्ह्यात ताशी १२ किमी, तर उर्वरित धाराशीव, संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते १० किमी आणि लातूर व नांदेड जिल्ह्यात
६ ते ७ किमी राहील. कमाल तापमान लातूर, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस तर धाराशिव, नांदेड, बीड जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १७ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला व वाशीम जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के, तर अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत २३ ते २५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १८ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा जिल्ह्यात १३ किमी तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा अकोला व अमरावती जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून, तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २७ टक्के इतकी कमी तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १७ टक्के राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात वायव्येकडून तर नागपूर जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस आणि गोंदिया जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअसपर्यंत, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १० ते १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आग्नेयेकडून व भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
आज (ता. १६) कोल्हापूर जिल्ह्यात ११ मिमी, सांगली जिल्ह्यात ८ मिमी, सातारा, कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत ८ ते ९ मिमी, पुणे जिल्ह्यात १२ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. १७) कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३ ते ४ मिमी पावसाची शक्यता आहे.
वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सातारा, सोलापूर जिल्ह्यांत १४ ते १५ किमी, पुणे जिल्ह्यात १२ किमी; तर उर्वरित जिल्ह्यात ९ ते १० किमी राहील.
कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २० टक्के राहील.
कृषी सल्ला
- द्राक्ष पिकाची खरड छाटणी करावी.
- नवीन लागवड केलेल्या नारळ रोपांना सावली करावी.
- फळबागेत एकरी ४ ते ५ गंध सापळे लावावेत.
- जनावरांना मुबलक प्रमाणात थंड आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.