Rain
RainAgrowon

Maharashtra Weather Forecast: राज्यात विजांसह पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता

Rain Alert : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. २५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.
Published on

Pune News: अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. २५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. रायगड, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्राकडे येत असल्याने, तसेच मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कणकवली येथे उच्चांकी १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या हजेरीने कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

Rain
Maharashtra Weather Update: राज्यात कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

आज (ता. २५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर रायगड, पुणे जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने आणि उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र निवळतेय

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकणच्या किनाऱ्यालगत असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी (ता.२४) दुपारनंतर रत्नागिरीजवळ जमिनीवर आले आहे. ही प्रणाली दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे येताना हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. या प्रणालीपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, उत्तर तेलंगणा ते दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : कणकवली १३०, देवगड १००, राजापूर, संगमेश्‍वर, रत्नागिरी प्रत्येकी ९०, वैभववाडी, लांजा प्रत्येकी ८०, रामेश्‍वर ७०, मुळदे ५०.

मध्य महाराष्ट्र : गगणवाबडा १००, राधानगरी ९०, फलटण ८०, शाहूवाडी, गारगोटी प्रत्येकी ७०, सातारा, कोकरूड, बारामती, वाई प्रत्येकी ६०, कराड, फलटण, पंढरपूर प्रत्येकी ५०, इंदापूर, कराड, पाटण, पंढरपूर प्रत्येकी ५०, इंदापूर, शिराळा, चंदगड प्रत्येकी ४०, जेऊर, खंडाळा, कोल्हापूर, अहिल्यानगर, दौंड, बार्शी, महाबळेश्‍वर प्रत्येकी ३०.

मराठवाडा : भूम, वाशी प्रत्येकी ६०, उदगीर, शिरूर कासार प्रत्येकी ५०, बीड, निलंगा, देवणी, चाकूर, औसा, रेणापूर, जळकोट, देगलूर, कळंब, सेलू प्रत्येकी ३०.

विदर्भ : कोर्पणा ५०, चंद्रपूर ४०, धानोरा ४०, गडचिरोली ३०.

Rain
Monsoon 2025: माॅन्सून मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात येणार; गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत माॅन्सूनची मजल

‎शनिवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२६.६---२१.०

अहिल्यानगर---२५.०---२०.६

‎‎धुळे---३५.०---२४.०

जळगाव---३४.१---२२.६

‎जेऊर---२५.०---२०.०

कोल्हापूर---२४.८---२२.०

‎महाबळेश्‍वर---१९.२---१६.२

‎मालेगाव---३५.०---२२.६

‎नाशिक---३०.२---२४.३

‎निफाड---३०.५---२३.७

‎सांगली---२५.५---२२.२

‎सातारा---२३.२---२०.३

‎सोलापूर---२९.४---२३.४

‎सांताक्रूझ---३४.०---२५.६

डहाणू---३४.९---२३.६

‎रत्नागिरी---२६.६---२३.२

‎छत्रपती संभाजीनगर---२६.८---२१.६

‎धाराशिव---३०.२---२०.९

‎परभणी---३०.९---२३.०

‎परभणी (कृषी)---३०.५---२२.६

‎अकोला---३३.६---२४.७

अमरावती---३३.६---२४.०

‎‎‎बुलडाणा---२८.३---२३.०

‎ब्रह्मपुरी---३३.८---२३.०

‎चंद्रपूर---३३.०---२२.२

‎गडचिरोली---३०.०---२३.०

‎गोंदिया---३४.२---२४.६

‎नागपूर---३४.०---२६.४

‎वर्धा---३४.०---२५.६

‎वाशीम---३१.०---निरंक

‎यवतमाळ---३३.०---२६.६

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, पुणे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com