Weekly Weather: मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: राज्यभरात पुढील आठवडाभर हवामानात बदल होत असून, हवेच्या दाबात घट व नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार असून, शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रावरील हवेचे दाब आज (ता.११) १००६ हेप्टापास्कल, तर उद्या (ता.१२) पूर्व भागावर १००४, तर मध्य व पश्‍चिम भागावर १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. मंगळवारी (ता. १३) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल, तर बुधवारी व गुरुवारी (ता.१४, १५) १००४ हेप्टापास्कल आणि शनिवारी (ता. १७) १००६ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे आठवडाभर राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र राहील. बुलडाणा, यवतमाळ, नागपूर व भंडारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ कि.मी., तर अकोला जिल्ह्यात ताशी २२ कि.मी. राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.

आज (ता.११) कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत, मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत, तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत, पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह व काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने कमाल व किमान तापमानात घट होईल. बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. मॉन्सून आगमनाच्या दृष्टीने वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून सुरू होईल. हिंदी महासागर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे बाष्पयुक्त वारे वेगाने वाहण्यास सुरुवात होईल. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याचे वेगात बदल जाणवतील.

हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्राचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. ते मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील. प्रशांत महासागराच्या पेरुजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १८ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअस इतके राहील. ही बाब चांगल्या मॉन्सूनसाठी उपयुक्त आहे.

Monsoon
Monsoon In Kerala: खूशखबर; माॅन्सून २७ मे रोजी केरळमध्ये येणार

कोकण

आज (ता.११) सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैॡत्येकडून, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वायव्येकडून आणि रत्नागिरी जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ३ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ६१ ते ६८ टक्के, तर पालघर जिल्ह्यात ८० टक्के राहील. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील. हवामान दमट राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज (ता. ११) नाशिक जिल्ह्यात १ ते २ मिमी पावसाची शक्यता आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ८ ते ११ कि.मी. इतका राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ६६ ते ६९ टक्के, तर धुळे जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २१ ते २५ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ३७ टक्के राहील.

मराठवाडा

आज (ता.११) धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात १ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. नांदेड जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ कि.मी. राहील. लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ कि.मी. राहील. धाराशिव, बीड, परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ कि.मी., तर हिंगोली व जालना जिल्ह्यांत ताशी वेग १४ कि.मी. राहील. कमाल तापमान बीड व जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ४६ टक्के, तर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५५ ते ६० टक्के आणि धाराशिव जिल्ह्यात ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २८ ते ३० टक्के, तर धाराशिव जिल्ह्यात ३२ टक्के, बीड जिल्ह्यात ४८ टक्के आणि जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३८ टक्के, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३९ टक्के राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अकोला जिल्ह्यात ५४ टक्के, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ६० टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यात ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के, तर वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत ४० ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाशीम जिल्ह्यात ताशी ११ कि.मी., अमरावती जिल्ह्यात १४ कि.मी., बुलडाणा जिल्ह्यात १८ कि.मी., तर अकोला जिल्ह्यात २२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

Monsoon
Pre Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व जोरदार पाऊस

मध्य विदर्भ

आज यवतमाळ जिल्ह्यात ९ मि.मी., तर नागपूर जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वर्धा जिल्ह्यात १४ कि.मी., तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत १८ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ५८ टक्के, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ६४ टक्के. दुपारची सापेक्ष आर्द्रता वर्धा जिल्ह्यात ३४ टक्के, अमरावती जिल्ह्यात ३६ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज (ता. ११) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून, तर गोंदिया जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ११ कि.मी., तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ताशी १४ ते १६ कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ६० ते ६८ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३६ ते ४० टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ कि.मी., तर पुणे, अहिल्यानगर व सांगली जिल्ह्यांत ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. सोलापूर जिल्ह्यात वारे ताशी १३ कि.मी. इतक्या वेगाने वाहतील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, अहिल्यानगर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७० ते ७६ टक्के, तर पुणे जिल्ह्यात ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४५ ते ५० टक्के राहील.

कृषी सल्ला

पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पक्व उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करावी.

पूर्वमोसमी पावसानंतर शेताची पूर्वमशागत करावी.

खरीप हंगामातील पीक नियोजनानुसार बी-बियाणे व खते यांची उपलब्धता करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com