Weather Update : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Rain Update :महाराष्ट्रावर या आठवड्यात १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहील.
Weather Update
Weather Update Agrowon

डॉ. रामचंद्र साबळे

Imd Alert : महाराष्ट्रावर या आठवड्यात १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहील. तसेच भारताच्या पूर्वेकडील मध्य भागावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे कोकणात मध्यम, उत्तर महाराष्ट्रात मध्यम, तर विदर्भ, मराठवाडा व दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
सध्या प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस असल्याने तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस, बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३०.१ अंश सेल्सिअस आणि अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस असल्याने या भागावर हवेच्या जास्त दाबाचे क्षेत्र राहील. तेथील वारे प्रशांत महासागराच्या दिशेने वाहतील, यालाच ‘एल निनो परिणाम’ म्हणतात. एल निनो मागील महिन्यात २१ ऑगस्टला सक्रिय झाला आहे. यापुढील काळात एल निनोच्या प्रभावामुळे ईशान्य म्हणजेच परतीच्या मॉन्सूनवरही परिणाम होईल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातही पावसाची कमतरता जाणवेल.

सध्या सातारा, सांगली व नगर जिल्ह्यांत १ जून ते ६ सप्टेंबर कालावधीत तेथील सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, परभणी, छत्रपती संभाजीनगर व धुळे या ७ जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा १ जून ते ६ सप्टेंबर या काळात ३० ते ३९ टक्के पाऊस कमी झाला आहे; तर सोलापूर, धाराशिव, गोंदिया, वाशीम, जळगाव, नंदुरबार या ६ जिल्ह्यांत तेथील सरासरीपेक्षा २१ ते ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. यावरूनच या वर्षी पावसाची कमतरता असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

कोकण ः
आज (ता. १०) सिंधुदुर्ग जिल्ह्यात व रत्नागिरी जिल्ह्यांत १४ मिमी, तर ठाणे जिल्ह्यात १६ मिमी, पालघर जिल्ह्यात ६ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २५ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.११) सिंधुदुर्ग, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यांत ३३ ते ३७ मिमी, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २६ मिमी, तसेच पालघर जिल्ह्यात ३५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वायव्येकडून, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. पालघर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किमी राहील. कमाल तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८१ टक्के राहील.

Weather Update
Weather Update : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्र ः
आज (ता. १०) नाशिक व धुळे जिल्ह्यांत ७ ते ९ मिमी, तर नंदुरबार जिल्ह्यात २२ मिमी व जळगाव जिल्ह्यात ४ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ११) नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ ते २७ मिमी, नाशिक जिल्ह्यात ४७ मिमी व धुळे जिल्ह्यात ७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८६ टक्के राहील.

Weather Update
Weather Update : राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता

मराठवाडा ः
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यांत रविवारी २ ते ५ मिमी पावसाची शक्यता असून सोमवारी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ ते १८ मिमी व धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात १.५ ते ५.३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १९ ते २२ किमी
राहील. हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर धाराशिव व बीड जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ अंश सेल्सिअस मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९६ ते ९० टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
आज (ता. १०) बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १.६ ते १.९ मिमी, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ११) अमरावती जिल्ह्यात ४ मिमी, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ७.५ मिमी ते ९.६ मिमी आणि बुलडाणा जिल्ह्यात १४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २२ किमी राहील. कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८३ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः
आज (ता.१०) यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २.१ ते ४.४ मिमी, तर नागपूर जिल्ह्यात ९ मिमी पावसाची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांत उद्या (ता.११) २ ते ५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते १९ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८० टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः
आज (ता.१०) भंडारा जिल्ह्यात २५ मिमी, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ५ ते ९ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.११) सर्वच जिल्ह्यांत १ ते ५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १५ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २४ ते २६ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८५ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः
आज (ता.१०) नगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांत १.५ ते ३ मिमी, तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ५ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. ११) पुणे, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यांत १३ ते १४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत वायव्येकडून तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते २१ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ टक्के राहील.

कृषी सल्ला ः
- मूग, मटकी, चवळी, सोयाबीन या पिकांवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करावा.
- शेतात बंदिस्त वाफे तयार करावेत. त्यात पावसाचे पाणी साचून वापसा येताच रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
- पिकांची पाण्याची गरज पाहून संरक्षित सिंचन करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com