Weekly Weather : अल्पशा पावसाची शक्यता

Weather Update : या आठवड्याचे सुरुवातीस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
Weather
Weather Agrowon

डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब बुधवार (ता. १०) पर्यंत राहील. हे हवेचे दाब महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर राहतील. मात्र गुरुवार (ता. ११)पासून पुढे हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके होतील. याच दरम्यान तापमानाची तीव्रता थोडी कमी झाल्याचे जाणवेल. जेव्हा हवेचे दाब कमी राहतात, तेव्हा तापमान अधिक असते.

त्यानुसार या आठवड्याचे सुरुवातीस उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. जेव्हा तापमानात वाढ होते, त्या वेळी सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होते. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. धाराशिव, बीड, लातूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वारे ताशी १६ ते १७ किमी इतक्या वेगाने वाहतील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल.

एप्रिल व मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल. जेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे पावसाची शक्यता निर्माण होईल. आज (ता.७) परभणी व बीड जिल्ह्यांत तसेच अमरावती व जालना, लातूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, विदर्भातील जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्य व ईशान्येकडून राहण्यामुळे तापमान घसरण होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि पूर्वमोसमी पावसाची शक्यता वाढेल. प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून ‘ला निना’ परिणाम सुरू झाला आहे.

कोकण

कमाल तापमान रायगड जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५४ टक्के, तर रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यांत ४५ ते ४६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४१ टक्के, तर उर्वरित रत्नागिरी, रायगड, ठाण व पालघर जिल्ह्यांत २१ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी सर्वच जिल्ह्यांत राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

Weather
Maharashtra Rain : पाऊस नेमका कुठे पडणार ? राज्यातील काही भागात गारपीटीचाही इशारा

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात १८ टक्के, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २३ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मराठवाडा :

कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर व हिंगोली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. बीड व परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व जालना जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि धाराशिव, लातूर, नांदेड व परभणी जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील.

सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी म्हणजे १५ ते १९ टक्के राहील. तसेच दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात ताशी २१ किमी; बीड जिल्ह्यात ताशी १६ किमी व लातूर जिल्ह्यात ताशी १५ किमी राहील. उर्वरित जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

पश्‍चिम विदर्भ

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी म्हणजे १६ ते १८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १४ टक्के इतकी कमी राहील.

त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा अमरावती, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत आग्नेयेकडून तर वाशीम जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.

Weather
Hailstorm Forecast : विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून गारपिटीचा इशारा

मध्य विदर्भ

कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते १७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ टक्के इतकी कमी राहील.

हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. या सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात २४ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत १० ते १४ टक्के राहील.

त्यामुळे सकाळी व दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ईशान्येकडून तर गोंदिया जिल्ह्यात वायव्येकडून राहील. गडचिरोली जिल्ह्यात ५ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मिमी आणि भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १.२ ते १.४ मिमी पावसाची शक्यता आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. सांगली, सोलापूर जिल्ह्यांत १७ किमी, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ताशी ९ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत वायव्येकडून, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील.

कृषी सल्ला

आंबा बागेत फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. काढणीसाठी झेल्याचा वापर करावा.

फळबागांमध्ये आच्छादन करून ठिबकद्वारे सिंचन करावे.

पावसाची शक्यता असल्याने रब्बी पिकांच्या काढणी, मळणीची कामे करून माल सुरक्षित स्थळी साठवावा.

जनावरांच्या गोठ्याभोवती कापडी पडदे लावावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com