Maharashtra Weather Update: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरविणारी थंडी असून, उर्वरित मध्य महाराष्ट्रातही गारठा कायम आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर मराठवाड्यात ढगाळ हवामान होते. आज (ता. २२) राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बंगालच्या उपसागरात ‘आक्वान’ चक्रीवादळ निवळले असून, उत्तर ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. मराठवाडा आणि परिसरात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. उत्तरेकडील थंड हवेमुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली. उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच होते..शनिवारी (ता. २१) जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ८ अंश सेल्सिअस, निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात प्रत्येकी ८ अंश, नाशिक येथे १० अंश सेल्सिअस, पुणे, जेऊर आणि सातारा येथे १२ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा कमी तापमानाची तर अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी (कृषी) येथे १४ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली..Rain Update: मराठवाड्यात हलक्या सरी शक्य; उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी.दिवसाच्यात कमाल तापमानात देखील चढ-उतार होत असून, शनिवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वरच आहे..‘अक्वान' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २२) विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानाची शक्यता कायम आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Maharashtra Weather Update: तापमानातील चढ-उतार कायम राहणार.शनिवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३०.५---११.२अहिल्यानगर---३२---१३.५धुळे---२९---८.२जळगाव---३०.६---८जेऊर---३१.५---१२कोल्हापूर---२९.५---१५.२महाबळेश्वर---२६.३---१४.४.नाशिक---२९.१---१०निफाड---२९.२---८.२सांगली---३०.८---१३.७सातारा---३०.८---१२सोलापूर---३४.४---१७सांताक्रूझ---३२.४---१६.२डहाणू---३१.४---१५.६रत्नागिरी---३४.२---१७.२.छत्रपती संभाजीनगर---३१.३---१३.८धाराशिव---३१.१---१५.४परभणी---३१.६---१८.२परभणी (कृषी)---३०.४---१३.८अकोला---३१.८---१६.६अमरावती---३२.६---१७.५ब्रह्मपूरी---२८.२---२०.२.बुलडाणा---२७.६---१६.८चंद्रपूर---२७.०---२०.६गडचिरोली---२५.२---१६.६गोंदिया---२६.८---१६.२नागपूर---३०.६---२०.२वर्धा---३१.५---२१.५वाशीम---३०.४---१४.२यवतमाळ---२८.६---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---८---३२पश्चिम महाराष्ट्र---११.२---३४.४कोकण---१५.६---३४.२मराठवाडा---१३.८---३१.६विदर्भ---१४.२---३२.६राज्यात गारठा वाढलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) :जळगाव ८, धुळे ८.२, निफाड ८.२, नाशिक १०, पुणे ११.२, जेऊर १२, सातारा १२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.