IMD Monsoon 2026 : शेतकऱ्यांची चिंता वाढली! देशात मॉन्सून हंगामात सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज; जूनमध्ये कमी पावसाची शक्यता
Monsoon In June 2026 : भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून हंगामातील पावसाचा सुधारित अंदाज शुक्रवारी (ता.२९) अंदाज जाहीर केला आहे. एप्रिलच्या अंदाजामध्ये देशात दीर्घकालीन सरासरी ९२ टक्के पावसाचा अंदाज हवामान वर्तवला होता.