Monsoon Forecast: आता तालुकास्तरीय मॉन्सून आगमनाचा अंदाज
Indian Monsoon Prediction: मॉन्सून आगमनाचा तालुकास्तरीय अंदाज देण्याबरोबरच, पर्जन्यमानाचा एक किलोमीटर सूक्ष्मतेपर्यंत अतिस्थानीय अंदाज आता शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान विभागातर्फे यंदाच्या मॉन्सून हंगामापासून या दोन्ही सेवा सुरू करण्यात येणार आहेत.