Monsson Session: सरकारच्या घोषणांमुळे शेतकरी खुश होतील का ?

Jagdish Devda: मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी हा अर्थसंकल्प मांडला. पाहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण या अर्थसंकल्पानं शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फेरलं.

Maharashtra Farmer: मध्यप्रदेशमध्ये दुसरं एक लोकप्रिया आश्वासन भाजपनं दिलं होतं. आश्वासन काय होतं तर लाडली बहना आणि लाडली लक्ष्मी योजनेसाठी प्रति महिना ३ हजार रुपये देण्याचं. निवडणुका झाल्या पण त्याबद्दल निर्णय काही झाला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा होती. पण या आश्वासनाचा मध्यप्रदेशमधील भाजप सरकारला विसर पडल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यात गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पापासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात होती. पण त्यावर मध्यप्रदेश सरकारनं मौन बाळगलं. आणि त्यावरून आता मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपला शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो, असं बोललं जातंय. मग मध्यप्रदेशच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही विशेष होतं का? तर सांगतो. मध्यप्रदेश सरकारनं लाडली लक्ष्मी आणि लाडली बहना योजनेसाठी २६ हजार ५६० कोटीं रुपयांची तरतूद केलीय. त्यामुळं यापुढेही या योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार २५० रुपये मिळणार आहेत. कारण मध्यप्रदेशमध्ये या योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला होता. हीच तीच योजना आहे ज्यावर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारलाही स्वार होण्याचा इच्छा दाटून आलेलीय. कारण राज्यातही विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आलीय. त्यामुळं महायुती सरकारनं मध्यप्रदेशच्या या योजनेची उचलेगिरी करून महाराष्ट्रात योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com