Fruit Crop Pruning: फळबाग छाटणी का गरजेची?

दर्जेदार फळांचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्याकरिता झाडाची तंत्रशुद्ध आणि वेळेवर छाटणी होणे गरजेचे आहे. फुलझाडे आणि फळझाडांना योग्य वळण आणि आकार देण्याकरिता छाटणी केली जाते. झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या यांचे ठेवण मजबूत राहण्यासाठी झाडावर योग्य तितक्याच जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, एकमेकींत गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात.

फुलझाडे आणि फळझाडांना योग्य वळण आणि आकार देण्याकरिता छाटणी केली जाते. झाडाचे मुख्य खोड आणि त्यावरील फांद्या यांचे ठेवण मजबूत राहण्यासाठी झाडावर योग्य तितक्याच जोमदार फांद्या ठेवून बाकीच्या रोगट, अशक्त, एकमेकींत गुंतलेल्या निरुपयोगी फांद्या कापून टाकण्याच्या क्रियेला छाटणी म्हणतात. छाटणीमुळे झाडाचा विस्तार योग्य प्रमाणात होऊन हवा आणि सूर्यप्रकाश यांचा फायदा झाडाच्या विस्ताराला मिळतो. त्यामुळे न छाटता राखलेल्या फांद्या जोमदारपणे वाढतात आणि त्यांना लागलेले फळे पक्व होईपर्यंत चांगली पोसली जातात. झाडांच्या फांद्यांचा वरचा भाग छाटणे आणि फांद्यांची त्यांच्या बुंध्यापासून छाटणी करणे असे छाटणीचे दोन प्रकार आहेत.  पहिल्या प्रकारच्या छाटणीमुळे फांदीच्या झाडावर उरलेल्या भागावरील सूप्त अवस्थेतील डोळ्यांमधून जोरदार नवीन फूट निघते आणि त्याच्यावर फुले, फळे येतात. सर्वच झाडांना नियमित छाटणी देणं आवश्यक असतं असं नाही, फळझाडांना द्यायची छाटणी ही त्यांची वाढ, कोणत्या वाढीवर फळधारणा होते इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. त्याचा अभ्यास करून नियमित आणि योग्य प्रमाणात फळे यावीत म्हणून छाटणीची वेळ आणि प्रकार ठरवतात. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com