Fruit Crop Management: फळे आणि भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा का होत नाही? जाणून घ्या कारणे

फळपिक आणि भाजीपाल्याच उत्पादन हे फूल व फळधारणेवर अवलंबून असत.फळबागांची या अवस्थेमध्ये काळजी घेण अत्यंत आवश्यक असते. फळधारणा न होण्यामागील कारणे जाणून घेऊन ती टाळल्यास फळबागेतून चांगल उत्पादन मिळविण शक्य होत. अलीकडे अनेक फळझाडांमध्ये फळधारणा न होण्याची समस्या दिसून येते.

फळझाडे आणि भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा न होण्याची समस्या अनेक ठिकाणी आढळते. झाडांची वाढ चांगली होत असली तरी फळे लागत नाहीत, यामुळे उत्पादन घटते. टोमॅटो, वांगी यांसारख्या पिकांसाठी योग्य तापमान गरजेचे असते. तापमान खूप जास्त किंवा कमी असल्यास फळधारणा होत नाही. झाडांना फुले आणि फळधारणा होण्यासाठी अन्नद्रव्ये आणि पाणी आवश्यक असते. वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात, त्यामुळे परपरागीकरण गरजेचे असते. मधमाशा आणि फुलपाखरांच्या अनुपस्थितीत फळधारणा कमी होते. सूर्यप्रकाशाचा अभाव, विशिष्ट तापमानाचा दोष, तसेच जास्त कीटकनाशक वापरामुळे मधमाशांची संख्या घटते, परिणामी परपरागीकरण कमी होते. काही किडी व रोगांमुळेही फळधारणा होत नाही. झाडांमध्ये संजीवकांची कमतरता असेल तर फुले आणि फळे गळतात. तसेच अयोग्य किंवा जास्त प्रमाणात रसायनांचा वापरही फळधारणेवर परिणाम करतो. त्यामुळे ही कारणे ओळखून योग्य वेळी उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट टाळता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com