Mol Nangar: मोल नांगरटी का आणि कधी करावी? जाणून घ्या फायदे

मोल नांगर आर्थात सब साॅयलरचे अनेक फायदेही आहेत. सब सॉयलर वापरामुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. सब साॅयलाॅरलाचे फायदे काय आहेत आणि वापर कसा होतो? हे आता आपण जाणून घेणार आहोत.

जमिनीखालील कठीण थर फोडणे हे शेतकऱ्यांसाठी तसे कठीण काम असते. पण शेतकऱ्यांना यासाठी मोल नांगर फायदेशीर ठरतो. याचा वापर प्रामुख्याने नांगरटीच्या अगोदर करावा लागतो. मोल नांगर आर्थात सब साॅयलर. सब सॉयलर हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून २.५ ते ३ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते. पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्‍यक आहे. पण जमिनिच्या प्रकारानुसार याचा वापर महत्वाचा आहे. सबसॉयलरमुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते. सबसॉयलर चालविण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com