Farmpond Lining: शेततळ्याचं प्लास्टिक अस्तरीकरण का आणि कसं करावं?

पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा लांबलेल्या पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी ठिबक किंवा तुषार पद्धतीने पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र शेततळे खोदल्यानंतर त्यामध्ये आस्तरिकरण केले जात नाही. अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.

टंचाईच्या काळात फळबागा वाचवण्यासाठी शेततळ्यातील पाणी उपयोगात आणले जाते. मात्र अनेक वेळा शेततळे उन्हाळ्याआधीच कोरडी होतात, कारण त्यांचे अस्तरीकरण केलेले नसते. अस्तरीकरणामुळे पाणी टिकून राहते आणि अधिक काळ साठवता येते. पाणी पाझरणाऱ्या जमिनीत ५०० मायक्रॉन प्लास्टिक फिल्मचा वापर करून अस्तरीकरण करावे. प्लास्टिक टाकताना मातीतील टोके वर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आणि त्यासाठी वाळू अथवा मऊ मातीचा थर टाकावा. प्लास्टिक फिल्म आयएसआय मानकांचे असावे आणि "अॅकरिंग" पद्धतीने ते 1.5 बाय 1.5 फुटांचा चर खेदून घ्यावा. यामुळे ते हलत नाही आणि अधिक काळ टिकते. शेततळ्याच्या आजूबाजूला कुंपण करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा प्राणी आत पडून अपघात होऊ शकतो. प्लास्टिक फिल्म योग्य पद्धतीने बसवून त्याचे ड्रेसिंग व फिनिशिंग करावे, जेणेकरून पाण्याच्या वजनाने ते खाली सरकणार नाही. अशा प्रकारे अस्तरीकरण केले तर उन्हाळ्यातही शेततळ्यात पाणी टिकते आणि शेतीस उपयुक्त ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com