Free Gas Cylinder: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत गॅस सिलेंडरसाठी कोणत्या महिला पात्र?

Eknath Shinde: या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ५२.१६ लाख कुटूंबांना लाभ मिळतो. आता मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांसोबतच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना वर्षभरात मोफत ३ गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाणार आहे.

Government Scheme for Women: या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर ज्या महिलांच्या नावावर गॅसची जोडणी आहे, म्हणजे कनेक्शन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. दुसरं म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत. तिसरं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थी महिलाही पात्र आहेत. चौथं म्हणजे एका कुटुंबात एकच लाभार्थी पात्र असणार आहे. तेही रेशन कार्डनुसार. म्हणजे काय तर एका कुटुंबात दोन महिला असतील, जसं की आईच्या आणि पत्नीच्या नावावर प्रत्येकी एक गॅस कनेक्शन असेल तर मात्र दोघीपैकी एकच जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहे. पाचवं म्हणजे ज्यांच्याकडे १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन आहे, अशा महिलांनाच हा लाभ देण्यात येणार आहे. तुम्हाला माहित्ये की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार गॅस सिलेंडरवर अनुदान देतं. म्हणजे गॅस सिलेंडर खरेदी करताना त्याची किंमत ग्राहकांला द्यावी लागते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com