Snake bite Remedy: जनावराला सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार काय कराल?

Animal Snake bite: साप चावल्या नंतर मेंदू आणि चेतासंस्थेवर परिणाम होतो. जनावर बेचैन होऊन हालचाल करत नाही. सतत ओरडते,नाका-तोंडा द्वारे फेस गाळते, दंशाची जागा काळी-निळी होते,त्या जागेतून रक्त आणि पिवळसर रंगाचा चिकट स्राव येतो.

Animal Health: प्राथमिक उपचार करताना  दंशाची जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुवावी. दंशाच्या जागेची हालचाल कमी करावी, जेणेकरून विष शरीरात गतीने पसरत नाही. विषाचा शरीरातील प्रसार कमी करण्यासाठी जखमेच्या वर काही अंतरावर दोरी किंवा कापड बांधावे. बांधलेले कापड १० मिनिटाच्या अंतराने काही सेकंदासाठी सैल करावे. लक्षात ठेवा दंशाची जागा चाकू किंवा धारदार शस्त्राने पसरवू नये. त्यामुळे जंतुसंसर्ग आणि धनुर्वात होण्याची शक्यता असते. जखमेवर तंबाखू लावणे असे प्रकार करु नयेत. कारण या गोष्टी लावल्याने शरीरातील धमण्यांची तोंडे मोठी होतात आणि सापाचे विष जास्तच भिनत जाते. लगेच पशुवैद्यकांना बोलवावं. ज्या सापाने दंश केला आहे, त्याचे तोंड ठेचू नये कारण तोंडाच्या रचनेवरून साप कोणत्या प्रजातीत मोडतो म्हणजे तो साप विषारी आहे की बिनविषारी याची कल्पना येते. त्यामुळे उपचार करणं सोपं जातं.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com