Honey bee Importance:फळबागेत मधमाशीच्या पेट्या ठेवताना कोणती काळजी घ्यायची ?

Crop Care: मधमाशी पेटी शक्यतो फुलकळी सुरू होण्यापूर्वी ५ ते १० दिवस आधीच आपल्या फळबागेत आणून ठेवावी.

Honey bee: मधमाशी पेटी व्यवस्थित काम करते की नाही हे बघायचे असल्यास पेटी ठेवल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण ऊन पडल्यावर ८ ते ९ या वेळेत मधमाश्‍या पेटीच्या मुख्य दारातून बाहेर येताना किंवा आत जाताना दिसतात. पेटीच्या मुख्य दरवाजातून मधमाश्यांची ये-जा दिसत नसल्यास मधमाशीपालकास त्वरित कळवावे. हिवाळ्यात मधमाश्‍या ऊन वाढल्यावर १० ते ११ नंतर ये-जा सुरू करतात. बागेत फुलोरा सुरू असल्यामुळे दिवसा मित्र कीटकमधमाश्‍यांच्याद्वारे परागीकरण होत असते. यादरम्यान बागेत कीटकनाशकाची फवारणी करू नये. फवारणीची गरज असले तर तज्ज्ञांच्या सल्याने योग्य कीडनाशकाची निवड करावी, योग्य वेळेतचं फवारणी करावी, त्यामुळे मधामाश्‍यांना त्रास होणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com