Methi market price: राज्यातील बाजारात पावसामुळे भाजीपाला पिकाची आवक कमी झाली आहे. मेथीची आवकही मागणीच्या तुलनेत कमी आहे. मेथीला सध्या बाजारात ३ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. तर प्रतिजुडी ११ ते १२ रुपये दर आहे. लसणाचे भाव राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत. लसणाला सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपयांचा दर मिळत आहे. लिंबाचे भाव मागील २ महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मे महिन्यात सरासरी ७ हजार रुपयाने विकले जाणारे लिंबू आता बाजारात २ हजार ५०० ते ३ हजार रुपयाने विकले जात आहेत. बाजारात मागील काही दिवसांपासून वांगी आवक कमी झाली आहे. बाजारात आज वांगी सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली गेली. देशातील बाजारात मागील तीन महिन्यापासून हरभरा भाव दबावातच आहेत. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.