Garlic Market Rate: जाणून घ्या; आजचे लसूण, दोडका, शेवगा, कोबी आणि बटाट्याचे बाजारभाव

market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण लसूण, दोडका, शेवगा, कोबी आणि बटाटा बाजाराची माहिती घेणार आहोत.

garlic market price: लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. बाजारात सध्या शेवग्याची आवक मर्यादीत स्वरुपात होत आहे. शेवगा प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढले आहे. सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com