Ginger Price: आले दर स्थिर; तसेच काय आहेत मका, ज्वारी, दोडका आणि काकडीचे आजचे बाजारभाव

Today's market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण आले, मका, ज्वारी, दोडका आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Ale bhav: राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत. सध्या आल्याला २५०० ते ३ हजार रुपये भाव मिळत आहे. मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. सध्या देशात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे उत्पादन चांगले झाल्याने दरावर दबाव असल्याचे दिसत आहे. ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यापासून काकडीची आवक कमी होत आहे. बाजारातील आवक मर्यादीत असल्याने सध्या काकडी १८०० ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com