Video
Soybean Rate: पामतेल आणि सूर्यफुल तेलाची आयात कमी तर सोयातेलाची आयात वाढली
जागतिक बाजारात जैवइंधनासाठी खाद्यतेलाचा वापर वाढल्यामुळे दराला आधार मिळत आहे. जागतिक पातळीवर वर्षाला जेवढे खाद्यतेल उत्पादन होते त्यापैकी २१ टक्के उत्पादन जैवइंधनासाठी जाते. इंडोनेशियाने जैवइंधनात पामतेलाचा वापर वाढवला. यामुळे पामतेलाचे भाव वाढले होते. तसेच अमेरिका, ब्राझीलही खाद्यतेलाचा जैवइंधनात मोठा वापर करत आहे.