Kisan Morcha: संयुक्त किसान मोर्चा 'या' मागण्यांसाठी करणार पुन्हा दिल्लीत आंदोलन

Guarantee Act: हमीभाव कायदा कर्जमाफीसोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

BJP: महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हरियाणात भाजपच्या जागा कमी झाल्या. हरियाणात तर २०१९ मध्ये १० जागांवर बाजी मारणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ५ जागा समाधान मानावं लागलं. त्याला अर्थात शेतकऱ्यांच्या नाराजीची पार्श्वभूमी आहेच. आता तर हरियाणातील शेतकरी आणि जाट मतदारांना आपल्याकडे खेचत सत्तेच्या समीकरणात निर्णायक भूमिका बजावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय लोकदलानं गुरूवारीच मायावती यांच्या बहुजन समाज पार्टी म्हणजेच बसपाशी आघाडी केलीय. एकूण ९० पैकी ५३ भारतीय राष्ट्रीय लोकदल तर ३७ जागा बसपा लढवणार आहे. या आघाडीत अजून काही पक्ष सामील होतील, असं विधान भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौटाला यांनी केलंय. त्यामुळे भाजप आणि कॉँग्रेसला रोखण्यासाठी तिसरी आघाडी हरियाणात उघडली गेलीय. आणि त्यांचा फोकस आहे जाट, शेतकरी आणि मायावती यांचा पारंपारिक मतदार यांच्यावर. भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि बसपा तिसऱ्यांदा एकत्र येतायत. बसपाचा हरियाणात पारंपरिक मतदार आहे. त्याचा फायदा घेऊन सत्ताधारी भाजपला खाली खेचण्याची तयारी सुरू केलीय. आघाडी-युतीच्या घडामोडी आणि संयुक्त किसान मोर्चाची आंदोलनाची घोषणा यांचं टायमिंग पाहता हरियाणात विधानसभा निवडणूकीचं राजकारण शेतकऱ्यांभोवती फिरण्याची शक्यता अधिक दिसतेय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com