Livestock Vaccination: जनावरातील अयशस्वी लसीकरणाची कारणं कोणती? जाणून घ्या

Why Animal Vaccination fail: आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण करण्यात येते. मात्र लसीकरण करूनही जर जना वरांमध्ये आजार पसरला, तर अशा वेळी ते लसीकरण अपयशी ठरले असे मानले जाते. लसीकरण अपयशामागील कारणे समजून घेण्यासाठी अनेक मूलभूत घटकांचा विचार करणे आवश्यक असते.

Reasons for failed Animal Vaccination: आजार नियंत्रणासाठी आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांमध्ये होणाऱ्या रोगांबाबत सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी जनावरांची प्रतिकारशक्ती, आजाराचा शरीरावर होणारा परिणाम, जनावरांचे वय, देखभाल, लसीकरणाची वेळ व स्थिती, तापमान, हवामान, प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय घटकांचा विचार करणे आवश्यक असते. काही वेळा जन्मजात आजार, बाहेरील जनावरांची ये-जा, वन्य प्राण्यांशी संपर्क, यामुळेही रोगाचा प्रसार होतो. लसीकरणामुळे जनावरांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि आजाराची तीव्रता कमी होते. हे आजार नियंत्रणाचे एक महत्त्वाचे साधन आहे. तरीही कधी कधी लसीकरणानंतरही रोगाची लक्षणे दिसतात आणि लस अयशस्वी ठरते.

लसीकरण अयशस्वी होण्याची कारणं

वय: लहान जनावरांची प्रतिकारशक्ती अजून पूर्ण विकसित झालेली नसते, तर मोठ्या जनावरांची प्रतिकारशक्ती काही कारणांनी कमकुवत झालेली असू शकते.

आईकडून मिळणारी प्रतिकारशक्ती: वासराला आईच्या दुधातून अँटीबॉडीज मिळतात, पण याच वेळी लसीकरण केल्यास हे अँटीबॉडीज लसीचा प्रभाव कमी करतात. म्हणून लसीकरणाची योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे. कधीकधी आईच्या कमकुवतपणामुळे किंवा नवजात वासरू योग्यरित्या दूध पीत नसल्यामुळे, त्याचे दुधात अँटीबॉडीजची पातळी पुरेशी राहत नाही.

आनुवंशिक कारणे: काही जनावरांमध्ये जन्मतःच प्रतिकारशक्ती कमी असते.

अपुरा पोषण: जर जनावराला आवश्यक पोषक तत्त्व मिळत नसतील, तर लस देऊनही प्रतिकारशक्ती तयार होत नाही.

ताणतणाव: वातावरण बदल, अपुरी निगा, अपुरा आहार, वाहतुकीची असुविधा, गर्दी यामुळे ताण निर्माण होतो व रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

चुकीच्या स्टेनचा उपयोग: रोगप्रतिकारक प्रतिक्रिया खूप विशिष्ट आहे. म्हणून, लसीमध्ये विषाणूचा योग्य स्टेन असणे आवश्यक आहे. अन्यथा निर्माण होणारी प्रतिकारशक्ती जनावराचे योग्यरित्या संरक्षण करू शकत नाही.

लसीची गुणवत्ता: लसीमध्ये पुरेशा प्रमाणात अँटीजेन नसल्यास, रोगप्रतिकारक प्रतिक्रिया कमी होते.

जुनी किंवा कालबाह्य लस: अशा लसींच्या अँटीजेनिक गुणधर्मांमध्ये घट होते आणि त्या लस दिल्यामुळे जनावराला ताण येतो.

चुकीची वेळ किंवा पद्धत: वय, हंगाम, डोस, लसीकरणाचा कालावधी आणि वापरण्याची पद्धत या गोष्टी लस उत्पादकाच्या सूचनांनुसार न केल्यास लसीकरण निष्फळ ठरते.

चुकीची साठवणूक किंवा वापर: लस योग्य तापमानात न ठेवली गेल्यास ती निष्क्रिय होऊ शकते. लसीकरणाच्या वेळी नवीन सुई वापरणे आणि लगेच तयार केलेले मिश्रण वापरणे आवश्यक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com